• लंडन : ब्रिटनच्या संसदेसमोर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी 'आयसिस'ने स्वीकारली
  • नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब
  • सातारा : उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
  • मुंबई : संपावर गेलेले १५२ डॉक्टर कामावर रुजू
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - कुस्तीत तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी किताब' पटकावणाऱ्या विजय चौधरीला नोकरीचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. कुस्तीत महाराष्ट्र केसरीची गदा हाती घेण्याची हॅट्ट्रीक करून विजयने नरसिंग यादवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता त्याचे पुढचे लक्ष्य हिंद केसरी आहे. त्यामुळे सरकारने विजयच्या नोकरीचे आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा विजयच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Published 11-Dec-2016 22:33 IST
जळगाव - फिरायला गेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि नगरसेवक पुत्राने रायगडावर मद्य प्राशन केल्याचा घृणास्पद प्रकार केला. ही बाब उघड होताच रायगडावरील जमावाने नगरसेवकासह नगरसेवक पुत्राला बेदम चोपल्याने खळबळ उडाली.
Published 11-Dec-2016 08:37 IST
जळगाव- येथील राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला लागलेल्या आगीत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प या अपघाताने ठप्प झाली होती.
Published 11-Dec-2016 07:14 IST
जळगाव - शालेय मुलींची छेड काढणाऱ्या चार ते पाच रोड रोमियोंची मुलींनी आधी छबी मोबाईलमध्ये बंद केली. त्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मुलींचा रुद्रावतार पाहताच त्या रोड रोमियोंनी धूम ठोकल्याचा प्रकार आज सकाळी बेंडाळे कन्या शाळेच्या परिसरात घडला.
Published 10-Dec-2016 10:06 IST
जळगाव - विहिरीवर पाणी पिण्यास गेलेल्या सुनेचा तोल गेल्याने सून विहिरीत पडली. त्यामुळे सुनेला वाचवण्यासाठी सासूने दोर धरला, मात्र दोराच्या झटक्याने सासूचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना अंमळनेर तालुक्यातील सडावण येथे शनिवारी घडली. पुष्पा विनोद पाटील आणि विमल आत्माराम पाटील असे त्या विहिरीत बुडून मृत झालेल्या सासू-सुनेची नावे आहेत.
Published 10-Dec-2016 08:51 IST
जळगाव - माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी काढलेल्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात मुरलीधर अण्णा पवार सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Published 09-Dec-2016 11:43 IST
जळगाव - भडगाव येथील निशा पाटील या विद्यार्थिनीने आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या गावातील एका घरातील झोळीत असलेल्या चिमुरडीला वाचविले. या पराक्रमामुळे तिची निवड राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. हलाखीची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या निशाच्या या निवडीने तिच्या शाळेसह कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
Published 09-Dec-2016 01:15 IST
जळगाव - मुंबई येथून चैत्यभूमीवरील कार्यक्रम आटोपून यवतमाळ जिल्ह्यातील वाईमेंढी या आपल्या गावी परत जाणाऱ्या अश्विन निवृत्ती इंगोले(३५) या तरुणाने जळगावातील फुले मार्केट परिसरात चांगलाच धिंगाणा घातला. विजेच्या खांबावर चढून त्याने शोले स्टाईल नाट्य केले.
Published 08-Dec-2016 22:52 IST
जळगाव - पतीसोबत न्यायालयातून घटस्फोट झाल्यानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या घटस्फोटित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रामेश्‍वर कॉलनीत घडली असून सविता सुरेश तायडे असे त्या आत्महत्या केलेल्या घटस्फोटित महिलेचे नाव आहे.
Published 08-Dec-2016 14:47 IST
जळगाव- शालेय पोषण आहारातील तांदुळ अफरातफरप्रकरणी जिल्हा परिषदेने माध्यमिकच्या ५ व खासगी प्राथमिकच्या दोन मुख्याध्यापकांवर दोषी असतांना संस्था चालकांनी कारवाई न केल्याने आता या सातही शाळांचे एप्रिल महिन्यात अदा होणारे वेतनेतर अनुदान रोखण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेने सुरू केल्या आहे.
Published 07-Dec-2016 17:09 IST
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गाव पातळीवर कॅशलेस व्यवहार व्हावेत, यासाठी सर्वत्र काम सुरु आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी दत्तक घेतलेल्या जामनेर तालुक्यातील सवतखेडे येथून या अभियानाची सुरुवात झाली.
Published 07-Dec-2016 17:03 IST
जळगाव - नोटबंदी आणि कॅशलेस इंडिया या विषयावर पथ नाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठान या शाळेच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत 'एकाच वेळी शहरातील बँकांमध्ये जाऊन पथनाट्य प्रयोग सादर करत जनजागृती केली आहे.
Published 07-Dec-2016 14:21 IST
जळगाव - अटक न करता प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फौजदाराने तक्रारदाराकडून एक हजारांची लाच घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामा सोमा वसतकर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
Published 07-Dec-2016 13:01 IST
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गाव पातळीवर कॅशलेस व्यवहार व्हावेत, यासाठी सर्वत्र काम सुरू आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी दत्तक घेतलेल्या जामनेर तालुक्यातील सवतखेडे येथे या अभियानाची सुरुवात झाली आहे.
Published 07-Dec-2016 12:55 IST

video playएकाच कुटुंबातील चौघांचा दगडाने ठेचून खून
एकाच कुटुंबातील चौघांचा दगडाने ठेचून खून
video playभाजपची राजकीय खेळी, ३८ सदस्य सहलीवर केले रवाना
भाजपची राजकीय खेळी, ३८ सदस्य सहलीवर केले रवाना

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

हे व्यायामप्रकार करुन उन्हाळ्यातही राहा फिट
video playही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी
ही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी

video playरजनीकांतच्या
रजनीकांतच्या '2.0' च्या सेटवर पत्रकाराशी गैरवर्तन