• नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात पेट्रोल पंप संचालकाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी, असे या हत्या झालेल्या पेट्रोल पंप संचालकचे नाव आहे. बोहरी पेट्रोल पंपाचे ते संचालक होते.
Published 04-May-2018 09:04 IST | Updated 09:14 IST
जळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र होत चालला आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांत खडसे यांनी स्वतः दमानियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खडसेंनी दमानियांवर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
Published 19-Apr-2018 20:24 IST | Updated 22:11 IST
जळगाव - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जामनेरमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठेका धरला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाही लेझीम हातात घेऊन नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.
Published 14-Apr-2018 12:17 IST | Updated 13:30 IST
जळगाव - जामनेरमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २५ जागांवर विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना गिरीश महाजन या ८ हजार ४०० मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. अंजली पवार यांचा प्रचंड मताधिक्क्याने पराभव केला.
Published 12-Apr-2018 12:33 IST
जळगाव - मोठा गाजावाजा करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गेल्या तीन महिन्यांपूर्वी 'उडान' योजनेंतर्गत जळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, एका आठवड्यातच विमानसेवा कोलमडली. त्यामुळे ही विमानसेवा नियमित सुरू राहणार की बंद पडणार, असा संभ्रम व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांमध्ये आहे.
Published 03-Apr-2018 16:02 IST
जळगाव - म्हणतात ना खोट कधीच लपत नाही, अशीच काहीशी घटना जळगावात उघडकीस आली आहे. दहावीच्या परीक्षेदरम्यान गोपनियतेच्या नावाखाली वर्गातील सीसीटीव्हीवर कपडा टाकण्यात आला होता. मात्र, त्यातील एका कॅमेऱ्यावरील कपडा खाली पडल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी पर्यवेक्षक, शिक्षकांनी केलेले कारस्थान सीसीटीव्हीत कैद झाले.
Published 03-Apr-2018 15:51 IST | Updated 16:03 IST
जळगाव - मोबाईल जेवढा सोयीचा असतो तेवढा तो वापरणाऱ्यांच्या जीवावरही बेतू शकतो, हेही तितकंच खरंय. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विकार खान सैफुल्ला खान असे या तरुणाचे नाव असून तो काट्या फाईल भागातील रहिवासी आहे.
Published 03-Apr-2018 15:22 IST
जळगाव - गेल्या काही दिवसांपासुन पक्षात घुसमट होत असल्याने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा आहे. याच दरम्यान माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनीही शरद पवारांना झुकुन नमस्कारMore
Published 31-Mar-2018 11:53 IST | Updated 14:02 IST
जळगाव - नातींच्या लग्नासाठी पै-पै करून जमवलेले अडीच लाख आगीत जळून खाक झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील कळंबे शिवारात घडली. या घटनेमुळे मेंढपाळ कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या ३० मार्चला त्यांच्या घरात लग्न सोहळा होणार होता. पदु मंगल्या ठेलारी असे नुकसान झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे.
Published 27-Mar-2018 16:20 IST
जळगाव - राज्यात उष्णतेची लाट पसरली असून उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील म्हसवे येथील शेतकरी वासुदेव श्रावण पाटील यांचा शेतात काम करत असताना दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला.
Published 26-Mar-2018 17:29 IST
जळगाव - जिल्ह्यातील वढोदा वनक्षेत्रात येणाऱ्या डोलरखेडा भागातील जंगलात शुक्रवारी दुपारी वाघिणीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली. मृत वाघिणीचे वय १८ वर्ष असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published 24-Mar-2018 10:56 IST
जळगाव - लोहार समाजातील मुलीला दत्तक घेऊन तिच्या कुटुंबियांसाठी हक्काचे घर बांधून दान दिल्याचा आगळावेगळा उपक्रम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
Published 19-Mar-2018 11:50 IST
जळगाव - शिक्षण आणि संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना शहरामध्ये घडली आहे. शिकवणी घेणाऱ्या या नराधम शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासणाऱ्या कृत्यामुळे पीडित विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी त्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
Published 19-Mar-2018 10:42 IST | Updated 10:43 IST
जळगाव - राज्यसभेवर नारायण राणे यांच्यासह माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा आहे. भुसावळ येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या खडसे यांना याविषयी विचारले असता त्यांनी अभंगातून प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला.
Published 11-Mar-2018 20:07 IST

video playडोकेदुखीवर
डोकेदुखीवर 'हे' आहेत घरगुती उपाय
video play..तर, भारतीयांच्या आयुर्मानात होऊ शकते वाढ!
..तर, भारतीयांच्या आयुर्मानात होऊ शकते वाढ!