• मुंबई- चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर मार्ग विस्कळीत
  • गुजरात निवडणूक- दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
  • नागपूर- हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधकांचा सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा
  • नागपूर- काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचे शरद पवार करणार नेतृत्व
  • न्यूयॉर्क - टाइम्स स्क्वेअरजवळ स्फोट, संशयित ताब्यात
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - परिवर्तन संस्था जळगाव आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या सहकार्याने आज ‘बंदूक्या’ चित्रपटाचा विशेष शो दाखविण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल चौधरी यांच्यासह सहकलावंतांचा सन्मान जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आला. चित्रपट पाहण्यासाठी शहरातील रसिकांची मोठी गर्दी होती.
Published 05-Sep-2017 12:25 IST
जळगाव - धुळे येथील गुड्ड्या हत्याकांडातील आणखी एक मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
Published 04-Sep-2017 22:36 IST
जळगाव - भुसावळ येथे चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून १० लाख ३६ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर शहरातील दुसऱ्या घटनेत अवैधरित्या विक्रीसाठी जाणारा सुमारे १० हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
Published 01-Sep-2017 22:50 IST | Updated 22:55 IST
जळगाव - राज्यात महाअवयवदान महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने येथील जिल्हा कारागृहात ‘संवाद पर्व’ आयोजित करण्यात आले होते. कैदी सचिन गुमानसिंग जाधव याने प्रातिनिधिक स्वरूपात मृत्युपश्चात अवयवदान करण्याचे संमती पत्र भरुन दिले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या या धाडसाचे कौतूक केले. यानंतर ४०० कैद्यांनी अवयवदानाचा संकल्प केला.
Published 31-Aug-2017 16:50 IST
जळगाव - पिंप्राळा आठवडे बाजारात महिलेच्या गळ्यातून पडलेली सोन्याची पोत भाजी विक्रेत्यास आढळून आली. या विक्रेत्याने प्रामाणिकपणे ती पोत महिलेस परत केली आहे. प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी या भाजी विक्रेत्याचा येथोचित गौरव केला.
Published 31-Aug-2017 15:56 IST
जळगाव - महिला तसेच मुलींच्या सुरक्षेबाबत येणाऱ्या समस्या महिलाच सोडवू शकतात या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा पोलीस दलाने आपल्या निर्भया पथकाच्या कार्यकक्षा वाढविल्या आहेत. शहरातील विविध महाविद्यालयातील १५० मुलींना पोलिसांनी निर्भया पथकांत सहभागी करून घेतले आहे.
Published 28-Aug-2017 16:02 IST
जळगाव - आपण पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. नवीन लोक येतात त्यांना संधी मिळत राहते. आता त्यांनीच पुढचे नेतृत्व सांभाळावे, असा सूचक इशारा देत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मंत्रिपद वापसीबाबत मार्ग खडतर असल्याचे भाकीत केले.
Published 26-Aug-2017 22:48 IST | Updated 22:57 IST
जळगाव - अंमळनेर तालुक्यातील रडावन येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी व दुष्काळी परिस्थितीमूळे आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतात फवारणीचे विषारी औषध घेवून करुन शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Published 26-Aug-2017 19:19 IST | Updated 19:38 IST
जळगाव - चिखली नदीत पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री गावात घडली.
Published 26-Aug-2017 18:44 IST
जळगाव - मनोरुग्ण चुलत्याने आपल्या ६ वर्षांच्या पुतण्याला विहिरीत फेकल्याने त्याचा करुण अंत झाला आहे. ही मन सुन्न करणारी घटना सोयगाव तालुक्यातील मोहळाई गावात घडली आहे. रूपेश मलीराम गढरी असे त्या मृत पुतण्याचे नाव असून पोलिसांनी मनोरुग्ण चुलता ऋषीकेश दीपक गढरीला ताब्यात घेतले आहे.
Published 26-Aug-2017 14:40 IST
जळगाव - 'धूम'स्टाईलने मंगळसूत्र लांबवण्यात कुविख्यात असलेल्या भुसावळच्या दोन चोरांच्या बुलडाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सादिकअली इबादतअली (२५) व त्याचा साथीदार मोहमद अली लियाकत अली इराणी (२८) असे त्या चोरांची नावे आहेत.
Published 26-Aug-2017 14:42 IST
जळगाव - अंमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील स्टेट बँकेसमोरील कोठारी अलंकार, अजय मेडिकल्स व महेश गेस्ट हाऊसमधील जे. पी. ड्रायफ्रुटच्या दुकानात चोरट्यांनी लूट करून पोबारा केल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेपासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published 26-Aug-2017 14:32 IST
जळगाव - राज्यभरात आज लाडक्या गणरायाचे वाजत गाजत मोठ्या धामधुमीत आगमन होत आहे. जळगावमध्येदेखील घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू आहे. शहरातील विविध भागांत पीओपी, तसेच शाडूच्या गणपती विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
Published 25-Aug-2017 20:17 IST
जळगाव - माजी न्यायाधीश ऐहतेश्याम गयासुद्दीन देशमुख यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
Published 25-Aug-2017 11:47 IST

नरभक्षक बिबट्याचा मालेगावमध्ये सातवा बळी

खोकला झालाय तर चॉकलेट खा
video playअनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
अनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
video playऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय
ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय

video play
'धाकड गर्ल' छेडछाड प्रकरणी विकास सचदेवला अटक
video play
'चिठ्ठी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत धनश्री काडगावकर !