• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - शेतात साचलेले दूषित पाणी प्यायल्याने रावेर तालुक्यातील अजंदा शिवारात मेंढपाळ कुटुंबाच्या ३२५ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे त्यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published 30-Mar-2017 10:44 IST
जळगाव- उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर आता कडक पोलीस कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरात टीव्ही, मोबाईल नसला तरी चालेल परंतु शौचालय असले पाहिजे, असा सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
Published 27-Mar-2017 16:37 IST
जळगाव - या संपूर्ण आठवड्यात जळगावातील तापमानात वाढ होत असून आजही तापमानाने ४१ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठल्याने मार्च हीटचा नागरिकांना प्रचंड तडाखा बसत आहे. यामुळे उन्हाने अक्षरश: भाजून निघत असल्याने शहर 'जळ'गावच होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
Published 27-Mar-2017 13:41 IST
जळगाव - मेहरुन तलावात पोहायला गेलेले २ विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूषण पाटील व निखिल पाटील, अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
Published 25-Mar-2017 18:18 IST
जळगाव - मंत्रालयात पोलिसांकडून शेतकऱ्याला झालेली मारहाण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, १९ आमदारांचे निलंबन या सर्व बाबींच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डफडे बजाओ आंदोलन केले.
Published 25-Mar-2017 18:12 IST
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेत बदलल्या गेलेल्या ७३ लाखांच्या बाद नोटा प्रकरण नुकतेच चांगलेच गाजले. या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून सीबीआयने जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांच्या दालनातील कागदपत्रांची कसून तपासणी केली.
Published 25-Mar-2017 07:26 IST
जळगाव- अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पातील २५ कोटींच्या तरतुदीसह ६२ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पाचे काम आठवडाभरात पुन्हा सुरू होणार आहे.
Published 24-Mar-2017 19:51 IST
जळगाव- एटीएम कार्डचा पिन नंबर विचारुन तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवत एकाने तुमचे एटीएम लॉक झाले आहे, असे सांगितले. त्यानंतर तरुणाला एटीएम कार्डचा पिन नंबर विचारून त्याची फसवणुक केली. याप्रकरणी तरूणाने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Published 24-Mar-2017 17:02 IST
जळगाव- भादली येथे एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांची चौकशी केल्याचे समोर आले आहे.
Published 24-Mar-2017 16:52 IST | Updated 18:25 IST
जळगाव- बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून त्यातील साडेतीन ग्रॅम सोन्याचे मणी पळवल्याची घटना जळगाव बस स्थानकात घडली. मंगळसूत्र तुटल्याची शंका आल्याने ती महिला बसमधून खाली उतरली. मात्र मंगळसूत्र चोरीला गेल्याची खात्री होताच तिने पोलिसांकडे धाव घेतली.
Published 24-Mar-2017 16:42 IST
जळगाव - अल्पवयीन मुलींची छेड काढत असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी दोघा युवकांची यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली आहे. ही घटना सिंधी कॉलनी परिसरात घडली.
Published 24-Mar-2017 16:01 IST
जळगाव - शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ऐनवेळी फुटलेल्या सदस्यांच्या पाठिंब्याच्या बळावर जळगाव जिल्हा परिषदेवर अखेर भाजपने झेंडा रोवला. अपघाताचे कारण पुढे करत राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी दांडी मारून भाजपला मदत केली. तर काँग्रेसच्या ३ सदस्यांनी थेट भाजपला मतदान केले.
Published 21-Mar-2017 22:05 IST
जळगाव - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची आज निवड होत आहे. या निवडीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने काँग्रेस तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली आहे. तर शिवसेनेला दूर ठेवत जिल्हा परिषदमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आखणी केली आहे.
Published 21-Mar-2017 14:15 IST
जळगाव- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची २१ मार्च रोजी निवड होत आहे. भाजपने एक सदस्यही फुटू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन राजकीय खेळी करत ३८ सदस्य अज्ञात ठिकाणी सहलीसाठी रवाना केले आहेत.
Published 20-Mar-2017 17:23 IST

video play

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण