• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - मनोरुग्ण चुलत्याने आपल्या ६ वर्षांच्या पुतण्याला विहिरीत फेकल्याने त्याचा करुण अंत झाला आहे. ही मन सुन्न करणारी घटना सोयगाव तालुक्यातील मोहळाई गावात घडली आहे. रूपेश मलीराम गढरी असे त्या मृत पुतण्याचे नाव असून पोलिसांनी मनोरुग्ण चुलता ऋषीकेश दीपक गढरीला ताब्यात घेतले आहे.
Published 26-Aug-2017 14:40 IST
जळगाव - 'धूम'स्टाईलने मंगळसूत्र लांबवण्यात कुविख्यात असलेल्या भुसावळच्या दोन चोरांच्या बुलडाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सादिकअली इबादतअली (२५) व त्याचा साथीदार मोहमद अली लियाकत अली इराणी (२८) असे त्या चोरांची नावे आहेत.
Published 26-Aug-2017 14:42 IST
जळगाव - अंमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील स्टेट बँकेसमोरील कोठारी अलंकार, अजय मेडिकल्स व महेश गेस्ट हाऊसमधील जे. पी. ड्रायफ्रुटच्या दुकानात चोरट्यांनी लूट करून पोबारा केल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेपासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published 26-Aug-2017 14:32 IST
जळगाव - राज्यभरात आज लाडक्या गणरायाचे वाजत गाजत मोठ्या धामधुमीत आगमन होत आहे. जळगावमध्येदेखील घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू आहे. शहरातील विविध भागांत पीओपी, तसेच शाडूच्या गणपती विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
Published 25-Aug-2017 20:17 IST
जळगाव - माजी न्यायाधीश ऐहतेश्याम गयासुद्दीन देशमुख यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
Published 25-Aug-2017 11:47 IST
जळगाव - तसे पाहिले तर मुंगूस आणि कोब्रा जातीच्या नागाचे प्रचंड हाडवैर. अनेकवेळा आपण मांजर आणि सापाची लढाईदेखील पहिली असेल. पण या शेतात सुरू होती तीन पाळीव कुत्रे अन् नाग यांच्यातील खुंखार लढाई. या कुत्र्यांनी अर्ध्या तासाच्या समरानंतर नागाचा खात्मा केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Published 24-Aug-2017 22:52 IST
जळगाव - शहर महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांनी आज अचानक पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी प्रभारी आयुक्त, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. महापौरांच्या राजीनाम्यामुळे महापालिका आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published 23-Aug-2017 22:38 IST
जळगाव - स्थानिक गुन्ह्यातील फरार महिला आरोपीला पोलिसांनी राजस्थान मधून ताब्यात घेतले आहे. छोटीबाई उर्फ यशोदाबाई बाविस्कर (३५) असे आरोपी महिलेचे नाव आहे.पोलिसांनी तिला राजस्थानमधील इटावा (जि.कोटा) येथून अटक केली आहे.
Published 23-Aug-2017 14:50 IST
जळगाव - काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तोफ डागली आहे.
Published 21-Aug-2017 13:29 IST
जळगाव - बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या हक्काचा मानला जातो. मात्र जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या या सणावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बैलपोळ्याच्या साहित्य खरेदीत पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे.
Published 21-Aug-2017 13:04 IST
जळगाव - टॅक्ट्ररचे साहित्य घेण्यासाठी जळगावात आलेल्या युवकास फोनवर संपर्क करत घरी बोलवून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ महिलांसह ४ संशयितांना ताब्यात घेतले होते. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
Published 19-Aug-2017 14:59 IST
जळगाव - आयटीआयमध्ये पहिल्याच दिवशी शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना जळगावात घडली. या विद्यार्थ्याच्या डोळ्यांना काळी पट्टी बांधुन दोन ते तीन जणांनी त्यास जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला पांडे डेअरी चौकाजवळ फेकून दिले.
Published 19-Aug-2017 14:15 IST
जळगाव - चोपड्यातील एका २४ वर्षीय युवतीवर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष ज्ञानेश्वर गेडे, असे अरोपीचे नाव असून, तो फरार आहे.
Published 19-Aug-2017 13:42 IST
जळगाव - जातीचे बनावट दाखले तयार करून, आदिवासींना गंडविणाऱ्या दोघांना अडावद पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून स्कॅनर, प्रिंटर या साहित्यासह २४ बनावट जातीचे दाखले जप्त केले आहेत. बुधवारी रात्री अडावद पोलिसांनी ही कारवाई केली.
Published 17-Aug-2017 13:59 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव