• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव - कांग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी शेतकरी कर्ज माफीसाठी राज्यभर संर्घष यात्रेचे आयोजन केले होते. ही यात्रा आज खान्देशात आली. यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकनाथ खडसेंची त्यांच्या फार्म हाउसवर जाऊन भेट घेतली.
Published 15-Apr-2017 22:08 IST
जळगाव - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी जिल्ह्यात विविध पक्षांची संघर्ष यात्रा येत आहे. असे असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Published 15-Apr-2017 21:33 IST
जळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त १२६ किलोग्रॅम वजनाचा केक कापण्यात आला. भीमराज गृपतर्फे या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Published 14-Apr-2017 21:09 IST
जळगाव - हिंदू-मुस्लिम ऐक्याची ७५० वर्षांची परंपरा असलेला बामोशी बाबा अर्थात हजरत पीर मुसा कादरी बाबांचा ३ दिवसांचा उरुस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये हा प्रसिध्द दर्गा आहे. ऐतिहासिक तलवार मिरवणुकीने या उरुसाची सुरुवात झाली.
Published 14-Apr-2017 19:39 IST
जळगाव - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेण्यात येत आहे. जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजीटल दरोडा घातला आहे.
Published 13-Apr-2017 18:30 IST
जळगाव - येत्या १५ एप्रिलला जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा दाखल होते आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी प्रथमच एकत्रित आले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.
Published 12-Apr-2017 10:50 IST
जळगाव - जिल्ह्याच्या तापमानाने ४३ अंशाचा पारा गाठला असून चालू महिन्यापासून अमळनेर व जामनेर तालुक्यात २२ गावांमध्ये पाणीटंचाईच्या प्रखर झळा बसू लागल्या आहे. या गावांमध्ये ३ टँकर व १३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाच गावांनादेखील पाणी टंचाई होत असून उपाययोजना करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत.
Published 12-Apr-2017 08:23 IST | Updated 08:36 IST
जळगाव - राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सरसकट बोगस डॉक्टर म्हणणे चुकीचे आहे. त्यांची उपचार पध्दत वेगळी असल्याने होमिओपॅथी डॉक्टरांना सरकार प्रशिक्षण देणार असल्याची माहिती वैदकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जळगाव जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर संघटना मेळाव्यात बोलत होते.
Published 11-Apr-2017 11:52 IST | Updated 11:54 IST
जळगाव - गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती नसल्याने पाण्याची टंचाई नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. उन्हाळ्यात कोणेतेही गंभीर जलसंकट ओढवणार नसल्याचे त्यांनी सूचीत केले
Published 11-Apr-2017 11:23 IST
जळगाव - राज्यातील काही गावांना पाणीटंचाई ही नित्याचीच असून हंडाभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. जळगावजवळील कुसूंबा गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पसापसा पाण्यासाठी नागरिकांना जीवाचे राण करावे लागत आहे.
Published 11-Apr-2017 10:01 IST
पुणे - भोसरी जमिन गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने आज बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), १५ आणि भादंवि १०९ प्रमाणे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, आणि इतर या प्रकरणाशी संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published 10-Apr-2017 20:35 IST
जळगाव - जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी उष्माघाताने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे.
Published 08-Apr-2017 22:46 IST
जळगाव - जिल्ह्यातील सावदा येथे चोरीचा एक वेगळाच प्रकार घडला आहे. पालिकेचा कचरा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published 08-Apr-2017 22:52 IST
जळगाव - चोरट्यांनी भरचौकातील मोबाईलचे दुकान फोडून २५ लाखाचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Published 07-Apr-2017 14:51 IST

video play

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण