• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
धुळे
Blackline
धुळे - महाराष्ट्र राज्यातील १३७ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांची नागपूर शहर उपायुक्त पदावर तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद पीसीआर येथे बदली झाली आहे. चैतन्या यांच्या जागेवर नागपूर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ चे समादेशक एम. रामकुमार यांची वर्णी लागली असून गवळी यांच्या जागेवर अमरावतीत अप्पर पोलीस अधीक्षक विवेकMore
Published 28-Apr-2017 18:57 IST
धुळे - जिल्ह्यात उष्माघाताने दुसरा बळी घेतला आहे. अशोक पितांबर पाटील (५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना ऊन असह्य झाल्याने पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Published 27-Apr-2017 11:44 IST
धुळे - पुणे येथे झालेल्या भाजप पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेश अध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
Published 26-Apr-2017 16:27 IST | Updated 16:33 IST
धुळे - शहरालगत असलेल्या नगावबारी परिसरातील जोशाबा फ्लोरा पार्क अँड ऍग्रो इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे १२ पॉली हाऊस जळून खाक झाले. संस्थेचे संचालक यांनी ही आग डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा दावा केला आहे. तर या संस्थेबद्दल अनेक तक्रारी असल्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी ही आग लावली गेल्याचा आरोप वकील घोडराज यांनी केला आहे.
Published 23-Apr-2017 12:39 IST
धुळे - पांजरापोळ परिसरातील बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारला. याप्रकरणी ३ भावंडांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा कारखाना कोणाचा याचा शोध पोलीस घेत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी ही कारवाई केली.
Published 20-Apr-2017 21:28 IST
धुळे - शहराचे आमदार अनिल गोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांच्यात सोशल मीडियावर 'मेसेज’युध्द भडकले आहे. बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर आ. गोटे विरुध्द मोरे यांच्या भांडणाचीच चर्चा होती.
Published 20-Apr-2017 19:14 IST
धुळे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील दारू दुकाने बंद झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करण्याचा सपाटा सुरू आहे. धुळे शहरातूनही दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. या महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करून नये, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. या मागणीचे निवदेन शिवसेने महापौर कल्पना महाले यांना दिले आहे.
Published 20-Apr-2017 16:13 IST
धुळे - पोलिसांनी दबंग कारवाई करत शहरातील बनावट मद्य निर्मिती कारखाना उध्वस्त केला. याप्रकरणी आजाद नखर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 20-Apr-2017 14:37 IST
धुळे - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहणार आहे, असा निर्धार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच उत्तर प्रदेशातील एक लाख कर्जमाफीचे मॉडेल मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते धुळ्यातील संघर्ष यात्रेदरम्यान बोलत होते.
Published 17-Apr-2017 07:45 IST | Updated 07:53 IST
धुळे - राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे आता सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे. भाजपचे सरकार केवळ बोलबच्चन आणि असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते धुळ्यात आयोजित संघर्ष यात्रेच्या सभेत बोलत होते.
Published 17-Apr-2017 07:39 IST
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजीत पवार यांनी सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा धारेवर धरले आहे. कर्जमाफी देत नसाल तर सत्तेतून पाय उतार व्हा, अशा शब्दात अजीत पवारांनी सरकारवर टिका केली.
Published 16-Apr-2017 17:00 IST
धुळे - शहरातील कोळवलेनगर परिसरातील संतप्त महिलांनी प्रस्तावित दारू दुकानाचे बांधकाम पाडले आहे. शिवसेना महानगर प्रमुख सतिश महालेंच्या नेतृत्वात महिलांनी हे आंदोलन केले.
Published 13-Apr-2017 16:25 IST
धुळे - जिल्ह्यातील भदाणे तालुक्यात शुक्रवारी सकाळी एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Published 07-Apr-2017 17:24 IST
धुळे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून ठराविक नियमानुसार दारू विक्री बंद करण्यात आली. यामुळे धुळे जिल्ह्यासह शहरात तळीरामांची मोठी पंचायत झाली. याचाच फायदा घेत महामार्गावरील काही बंद हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंटवर सर्रासपणे बनावट दारू विक्रीचा धंदा तेजीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Published 07-Apr-2017 12:49 IST

video playकोट्यवधी रुपयांचे १२ पॉली हाऊस आगीत जळून खाक
video playएम. रामकुमार धुळ्याचे नवे पोलीस अधीक्षक
एम. रामकुमार धुळ्याचे नवे पोलीस अधीक्षक

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे