• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यात धारणगाव शिवारात वाडीरोड येथे शेततळ्यात पडून तीन जणींचा मृत्यु झाला आहे. तीन वर्षाच्या मुलीस वाचवण्यासाठी गेलेली तिची बहिण आणि आईचाही यात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Published 09-Mar-2017 22:37 IST
अहमदनगर - शिर्डी येथे सर्वोच्च न्यायालयाने शिर्डी संस्थानवर तातडीने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिर्डी संस्थानच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुबल गुप्ता यांनी साई समाधीचे दर्शन घेत पदभार स्विकारला.
Published 09-Mar-2017 16:44 IST
अहमदनगर - पांगरमल दारूकांडप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नवनाथ धाडगेला एमआयडीसीतून मंगळवारी रात्री अटक केली. नवनाथ इतर आरोपींबरोबर बनावट दारू बनवत होता. बनावट दारूकांडप्रकरणी आतापर्यंत १७ पैकी १५ जणांना अटक करण्यात आली.
Published 09-Mar-2017 08:54 IST
अहमदनगर - बदली टाळण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याने ७६ शिक्षकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याने नोकरीतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस त्यांना बजावली आहे.
Published 08-Mar-2017 10:30 IST
अहमदनगर - अकलापूरमधील एका दत्त मंदिराचा कळस चोरीला गेला आहे. या घटनेमुळे भाविक संतप्त झाले असून त्यांनी आज गाव बंदची हाक दिली आहे. घारगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेत आहे.
Published 07-Mar-2017 16:07 IST
अहमदनगर - विवाह सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडला. मात्र श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी आपला विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात केला. आपल्या बरोबरच परिसरातील नऊ वधू वरांचा विवाह त्यांनी पार पाडला.
Published 07-Mar-2017 08:15 IST | Updated 08:23 IST
अहमदनगर - वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिर्डी शहर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डीतील ग्रामस्थ आणि पोलिसांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे.
Published 06-Mar-2017 08:11 IST
अहमदनगर - पांगरमल दारूकांड आणि संदीप वराळ यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात मोक्काचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पोलीस उपअधीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना हा प्रस्ताव सादर केला. पांगरमल दारूकांडातील १६ आरोपींना मोक्का लागणार आहे.
Published 05-Mar-2017 10:39 IST | Updated 13:51 IST
अहमदनगर - पांगरमल दारूकांडातील फरार सूत्रधार याकूब शेखच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुसक्या आवळल्या. गस्ती पथकाने नगर-पुणे मार्गावर शनिवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. चास परिसरात संशयास्पदरित्या वावरताना तो आढळून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले.
Published 05-Mar-2017 07:32 IST | Updated 07:33 IST
अहमदनगर- भाजपच्या आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. भाजप कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सत्कार झाला.
Published 04-Mar-2017 18:23 IST
अहमदनगर - बनावट दारूकांड प्रकरणी पोलीस निरीक्षकासह नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला फौजदारासह दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तर तोफखाना पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना मुख्यालयात हालवण्यात आले आहे.
Published 04-Mar-2017 17:59 IST
अहमदनगर- येथे दोन कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आले.
Published 04-Mar-2017 16:51 IST
अहमदनगर - शिर्डी जवळील कोपरगाव शहरातील संजय नगर येथील चमडेबाजार शेजारी रात्री १० च्या सुमारास भंगार गोदामाला भीषण आग लागली. गोदामामध्ये लाकुड, प्लास्टीक असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट उठू लागल्याने तसेच आग पसरू लागल्याने जवळ राहणारे नागरिक भयभीत झाले.
Published 04-Mar-2017 10:46 IST
अहमदनगर - प्रात:विधीला गेलेल्या महिलेला जबरदस्तीने उचलून घरात नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याने पीडितेला गर्भधारणा झाली. मात्र जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय होडशिळ असे त्या बलात्कारी नराधमाचे नाव आहे.
Published 03-Mar-2017 12:22 IST

video playविखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील
विखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे