अहमदनगर - पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने २०१२ पासून क्रमप्राप्त असलेल्या वेतनवाढ, समान काम-समान वेतन, अपघात विमा, प्रवास भत्ता, वैद्यकीय रजा, तसेच प्रसूती रजा इत्यादी मागण्या केल्या.
Published 21-Feb-2018 10:12 IST