• जोधपूर - बलात्कार प्रकरणी आसारामसह ३ दोषी दोघांची निर्दोष मुक्तता
  • नागपूर - भाजप अध्यक्ष अमित शाह आज येणार संघ मुख्यालयात
  • युक्तीवादानंतर कोर्ट घेणार शिक्षेसंदर्भातील निर्णय
  • कोर्टात आता शिक्षेसंदर्भात होणार युक्तीवाद
  • जोधपूर कोर्टाने दिला निर्णय
  • आसारामसह इतर सहआरोपीही बलात्कार प्रकरणी दोषी
  • जोधपूर - आसाराम बापू बलात्कराच्या आरोपात दोषी
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने शनिवारी, दिनांक २४ मार्च २०१८ ते सोमवार दिनांक २६ मार्च २०१८ याकाळात श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
Published 17-Mar-2018 07:32 IST | Updated 07:33 IST
अहमदनगर - आयोध्येत राम मंदिरच होणार, असा दावा अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये ज्ञानमंदीर लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राम मंदिर हे दोन्ही समाजाच्या सहमतीने बनणार. आतापर्यंत हातात घेतलेल्या कामाला यश आले आहे, या कामालाही यश येईल. इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
Published 15-Mar-2018 18:49 IST
अहमदनगर - बातमीच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. अजीज बाबू इनामदार असे अटक केलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. या आरोपीकडून १० हजारांच्या मुद्देमालासह बनावट ओळखपत्र आणि बूम जप्त करण्यात आला आहे. या तोतया पत्रकाराने लॉरेन्स स्वामी या व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागितली असल्याची बाब तपासात समोर आली आहे.
Published 13-Mar-2018 21:12 IST
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका झाली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात छिंदमने जामीनदार आणि जातमुचलक्याची पुर्तता केल्याने त्याची जामिनावर आज सुटका करण्यात आली.
Published 13-Mar-2018 19:45 IST
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील माणीकदौंडी घाटात ऊस तोडणी कामगारांचा ट्रॅक्टर पलटी झाला आहे. या अपघातात १२ ऊस तोडणी मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि बालकांचा समावेश आहे.
Published 10-Mar-2018 12:29 IST
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे छिंदमचा कोठडीतील मुक्काम आता वाढला आहे.
Published 09-Mar-2018 18:47 IST | Updated 19:10 IST
अहमदनगर - पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या मुलाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याचे कारण म्हणजे या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार पुत्र चक्क तलवारीने केक कापताना दिसून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Published 08-Mar-2018 10:31 IST
अहमदनगर - पत्नी शारीरिक संबंधासाठी सतत नकार देत असल्यामुळे पतीने तिचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी कोपरगाव येथील खडकी भागात सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या नराधमाने पत्नीसह स्वत:च्या चिमकुलीचाही खून केला आहे. गणेश खरात, असे पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्याचे नाव आहे.
Published 06-Mar-2018 18:18 IST | Updated 18:22 IST
अहमदनगर - मनपाच्या उपमहापौर पदी शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने बोरुडे यांची बिनवरोध निवड झाली.
Published 05-Mar-2018 14:21 IST | Updated 14:55 IST
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. कानिफनाथ महाराजांच्या मुख्य समाधी मंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाच्या मनाच्या काठीची भेट देऊन यात्रेस सुरुवात करण्यात आली.
Published 02-Mar-2018 15:39 IST
अहमदनगर - येथील आजच्या उध्दव ठाकरे यांच्या सभेत गदारोळ आणि दगडफेक झाली. तसेच ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जाताना त्यावरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही कार्यकर्त्यांची डोकीही फुटली.
Published 27-Feb-2018 14:47 IST
अहमदनगर - अहमदनगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर ९ फूट अतिक्रमण झाल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधी यांच्या बंगल्याची महापालिकेने मोजणी केली होती. यामध्ये ९ फूट अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे.
Published 26-Feb-2018 22:12 IST
अहमदनगर - दुष्काळावर मात करणाऱ्या महाराष्ट्रातील हिवरे बाजार गावाला दक्षिण आफ्रिकेच्या शिष्ठमंडळाने भेट दिली. हिवरे बाजारमधील दुष्काळ निवारणाचे काम दक्षिण आफ्रिकेतील देशांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या शिष्ठमंडळाने यावेळी व्यक्त केले.
Published 26-Feb-2018 20:55 IST | Updated 20:56 IST
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या ठरावालाही महापौरांनी महासभेत मंजुरी दिली.
Published 26-Feb-2018 15:45 IST | Updated 16:09 IST


video play
'सरोज खान यांच्याबद्दलचा आदरच निघून गेला'