• नवी दिल्ली - जिनपिंग यांच्याशी खास चर्चेसाठी आज पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर
  • नाशिक - शिवसेनेत अंतर्गत वाद, राऊतांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची दांडी
  • लातूर - संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना दिला कचरा भेट
  • अकोला - संभाजी ब्रिगेडकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड
  • मुंबई - कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा मार्ग मोकळा - बडोले
  • नवी दिल्ली - लोकांनी खरे संत आणि भोंदू यांच्यात फरक करावा - अशोक गेहलोत
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये राजकीय कार्यकर्त्याची हत्या
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. राळेगणसिद्धी येथे पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात आले आहे. अण्णांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा, उडी मारू असा इशारा आंदोलकांनी दिला.
Published 26-Mar-2018 14:41 IST
अहमदनगर - शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये आज रामनवमी निमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली.
Published 25-Mar-2018 21:32 IST
अहमदनगर - साईबाबा समाधी शताब्दी वर्षात रामनवमी उत्सवाला शिर्डी ग्रामस्थांच्या दृष्टीने अनन्य साधारण असे महत्व आहे. या दुहेरी योगायोगामुळे शिर्डीतील ४५ भाविकांनी शिर्डी ते काशी असा तब्बल १४०० किलोमीटरचा पायी प्रवास करत गंगाजल आणले आहे.
Published 24-Mar-2018 21:37 IST
अहमदनगर – शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरतीने सुरवात झाली आहे. बाबांची प्रतिमा, पोथी, पादुका आणि विनाची सवाद्य मिरवणूक साईमंदिरापासून गुरुस्थानमार्गे द्वारकामाई पर्यंत नेण्यात आली. तिथे साई चरित्राचे अखंड पारायण करुन या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थानचे कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते साईंची पाद्यपूजा करण्यात आली.
Published 24-Mar-2018 16:25 IST
अहमदनगर - एक गोळी ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. चांगला अर्थ काढावा, यासाठी साईबाबा त्यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना उंदीर प्रकरणावरून टोला लगावला आहे. आज शिर्डीत साईदर्शनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
Published 24-Mar-2018 15:34 IST
अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानने मुंबई येथील साईसेवक मंडळाच्या पालखीला साईमंदिर परिसरातील लेंडी बागेजवळ पालखी ठेवण्यास आणि पारायण करण्यासाठी मज्जाव केला होता. यामुळे साईसेवक पालखीतील हजारो पदयात्रींनी साईबाबा संस्थानच्या गेट समोर नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
Published 24-Mar-2018 14:19 IST
अहमदनगर - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनलोकपाल, निवडणूक सुधारणा इ. मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राळेगणसिद्धीमधील ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून पाठिंबा दर्शवला.
Published 24-Mar-2018 07:20 IST
अहमदनगर - दि कॉमेडी विथ कपील या नावाजलेल्या टीव्ही सिरीजमधील गुत्थी अर्थात विनोदी अभिनेता सुनिल ग्रोव्हर याने आज साई दरबारी हजेरी लावली. मध्यान्ह आरतीला उपस्थित राहत त्याने साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
Published 23-Mar-2018 20:23 IST
अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात कौटुंबिक कलहाला कंटाळून मातेने स्वत: सह आपल्या दोन अपत्यांना विष पाजून आत्महत्या केली आहे. सुदैवाने महिलेचा ६ महिन्याच्या चिमुकला या घटनेत बचावला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Published 23-Mar-2018 19:22 IST | Updated 19:34 IST
अहमदनगर - जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यात जिल्हा बँकेची शाखा लुटण्याचा प्रयत्न झाला. वाळवी गावातील जिल्हा बँकेत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला.
Published 23-Mar-2018 11:01 IST | Updated 11:33 IST
अहमदनगर - जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे शेतकऱ्याने पत्रात म्हटले आहे. हा शेतकरी नगर तालुक्यातील रांजणी येथील असून लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे.
Published 23-Mar-2018 08:02 IST
अहमदनगर - कुरियर कार्यालयात ज्या पार्सलचा स्फोट झाला, ते पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे होते, अशी माहिती आता समोर येत आहे. संजय नहार हे काश्मीर येथील मुला-मुलींचे पुनर्वसनाचे काम करतात. त्यामुळे कोणत्या दहशतवादी संघटनांचा यात हात आहे का? याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच संजय नहार यांच्या घातपाताची शक्यता असल्याची देखील चर्चा होत आहे.
Published 21-Mar-2018 17:39 IST | Updated 18:45 IST
पुणे - अहमदनगरमध्ये कुरियरच्या कार्यालयात पार्सलच्या बॉक्समध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोट झालेले ते पार्सल सरहद संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये सामाजिक काम करणाऱ्या संजय नहार यांच्यासाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Published 21-Mar-2018 13:55 IST
अहमदनगर - कुरीअर पार्सलच्या बॉक्समधे भिषण स्फोट झाल्याची घटना शहरातील एका कुरीअर सेवा देणाऱ्या ऑफिसमध्ये घडली. माळीवाड्यातील मारुती कुरिअरमधे १० वाजतात्या सुमारास हा स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. पार्सलमध्ये झालेल्या या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Published 21-Mar-2018 10:21 IST | Updated 10:30 IST

video play
'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा