• नवी दिल्ली - जिनपिंग यांच्याशी खास चर्चेसाठी आज पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर
  • नाशिक - शिवसेनेत अंतर्गत वाद, राऊतांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची दांडी
  • लातूर - संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना दिला कचरा भेट
  • अकोला - संभाजी ब्रिगेडकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड
  • मुंबई - कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा मार्ग मोकळा - बडोले
  • नवी दिल्ली - लोकांनी खरे संत आणि भोंदू यांच्यात फरक करावा - अशोक गेहलोत
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये राजकीय कार्यकर्त्याची हत्या
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - मुस्लीम समाजातील वाघवाले समाजाच्या कुटुंबाला जातपंचायतने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दोन परिवार आज जातपंचायतमुळे बहिष्कृत असाह्य जीवन जगत आहेत. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पाठपुरावा केला. प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर लोणी पोलिसांनी एका प्रकरणात ७ पंचांविरोधात गुन्हा दाखल केला.
Published 06-Apr-2018 20:27 IST
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. भाजपमधून बडतर्फ करण्यात आलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला १५ दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
Published 02-Apr-2018 15:31 IST
अहमदनगर - प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला भीषण आग लागली. ही घटना आज (रविवार) नगरच्या पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग परिसरात दुपारी घडली. या आगीत कांबळे यांचा स्टुडिओ भस्मसात झाला आहे. या धक्क्याने अस्वस्थ वाटू लागल्याने शिल्पकार प्रमोद कांबळे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 01-Apr-2018 16:08 IST | Updated 22:24 IST
अहमदनगर - ओम उद्योग समुहाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातच त्यांनी ही आत्महत्या केली. कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
Published 01-Apr-2018 06:54 IST
अहमदनगर - संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव अनेक दशकांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. इंग्रज काळात उत्सवाला केलेली बंदी झुगारून नारी शक्तीने रथ ओढत मिरवणूक काढली. त्यामुळे महिलांनी रथ ओढून ही आजही परंपरा जोपासली आहे.
Published 31-Mar-2018 20:21 IST
अहमदनगर - केंद्रीय रेल्‍वेमंत्री आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रेल्‍वे स्‍थानकाचीही पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले, की यंदा साईबाबा समाधीचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने उत्तम सुविधा देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे.
Published 31-Mar-2018 20:11 IST
अहमदनगर - तरुणांनी जाळल्याने भाजलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. मात्र मृत्युपूर्व जबाब आणि एफआयआरमध्ये याचा उल्लेख नाही. याबाबतचा पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.
Published 29-Mar-2018 15:27 IST
अहमदनगर - ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आणि शेतकरीप्रश्नी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. राळेगणसिद्धीसह पारनेरच्या नागरिकांनी हे रास्तारोको आंदोलन केले आहे. त्यामुळे काही काळ या महामार्गावर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.
Published 29-Mar-2018 13:56 IST
अहमदनगर - कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करणारे शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यातील चौघांना ५ वर्षांचा तुरुंगवास तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हत्येचा कट रचणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
Published 28-Mar-2018 16:55 IST
अहमदनगर - जिल्ह्यातील वाळू तस्करांना जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोठी कारवाई करून दणका दिला. राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत महसूल विभाग आणि पोलीस पथकाने १५ डंपर, ३ जेसीबी आणि २ ट्रॅक्टर असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला.
Published 28-Mar-2018 15:40 IST
अहमदनगर - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक २४ मार्च २०१८ ते २६ मार्च २०१८ या कालावधीत श्री रामनवमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये रुपये ०४ कोटी ३३ लाख इतकी देणगी प्राप्‍त झाली. ही माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
Published 27-Mar-2018 20:04 IST
अहमदनगर - गेले तीन दिवस शिर्डीत साईमंदिरात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. या रामनवमी उत्सवाची सांगता आज काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून करण्यात आली. रामनवमी उत्सवादरम्यान साईभक्तांनी सोन्याच्या पादूका व पंचारतीसह एकूण ७१ लाखांचे सुवर्णदान केले आहे.
Published 26-Mar-2018 16:42 IST
अहमदनगर - बिबट्याच्या हल्यात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अश्विनी सिताराम कडाळे असे हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
Published 26-Mar-2018 16:23 IST
अहमदनगर - जिल्ह्यात कुकडीच्या पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडली आहे. श्रीगोंदा तालुक्यात आढळगाव परिसरात दोन मृतदेह आढळलेत. तर पारनेर जवळेत एक मृतदेह आढळला आहे. जवळेला सिद्धेश्वर ओढ्यात बंधाऱ्यात मृतदेह आढळून आला. तीनही मृतदेह पुरुषांची आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस तपास करत आहेत.
Published 26-Mar-2018 14:45 IST | Updated 14:50 IST

video play
'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा