• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - साई संस्थानच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या साईनाथ रुग्णालयाजवळील भोजनकक्ष हा दोन दिवसांपूर्वी इमारत विस्तारीकरणाचे कारण देत बंद करण्यात आला. याला पर्यायी व्यवस्था परिसरात नसल्याने रुग्ण व नातेवाईकांचे अतोनात हाल सुरू आहेत. यामुळे रुग्णांना असणारी साईसंजीवनीच बंद झाल्याने नातेवाईकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
Published 21-Apr-2017 13:50 IST
अहमदनगर - राज्यातील ग्रामीण विकासाच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रातील ११ खासदारांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या खासदारांनी शिर्डी येथील साईमंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी काही खासदार कुटूंबासह दिसून आले.
Published 21-Apr-2017 10:10 IST
अहमदनगर - कर्जत तालुक्यात मायलेकींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना गुरवपिंप्री तलावात घडली. मीरा थोरात (३२), मुलगी ज्ञानेश्वरी थोरात अशी मृत मायलेकींची नावे आहेत.
Published 21-Apr-2017 09:59 IST
अहमदनगर - राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च्याच खात्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बदलले आहे, मात्र अजूनही लिफाफा पद्धत बंद झाली नाही, असा जाहीर आरोप करत भ्रष्टाचाऱ्यांना सुधारण्याचा त्यांनी इशारा दिला. राळेगणसिद्धीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर ते बोलत होते.
Published 20-Apr-2017 20:27 IST | Updated 21:01 IST
अहमदनगर - भूमाता रणरागिणी बिर्गेडच्या तृप्ती देसाई यांनी महिला मंदिर प्रवेशाच्या आंदोलननंतर आता दारूमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेतले आहे. यासाठी ठिकठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेतली असून, याच पार्श्वभुमीवर राहुरी शहरात आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Published 19-Apr-2017 20:30 IST | Updated 21:16 IST
अहमदनगर - पारनेर तालुक्यातील शेतकरी शिवाजी आमले यांनी विष पिऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री विष प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Published 19-Apr-2017 14:29 IST
अहमदनगर - देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेला ठकसेन विजय मल्ल्याला लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. यावर 'गुन्हेगार हस्तांतरण कायद्या' प्रमाणे ठकसेन मल्ल्याविरुध्द ब्रिटीश कायद्यानूसार सबळ पुरावे देऊन दोषी ठरवावे लागेल, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्जवल निकम यांनी दिली.
Published 19-Apr-2017 12:13 IST | Updated 16:39 IST
अहमदनगर - दारुबंदी आणि ग्राम रक्षक दलासंदर्भात चर्चेसाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: राळेगणसिद्धीत येणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या दोन्ही गोष्टीत काही दुरुस्त्या सूचवल्या होत्या. त्यावर या भेटीत चर्चा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
Published 19-Apr-2017 10:51 IST
अहमदनगर - आवर्तन सुरू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाणी द्यावे, अशा मागणीचे अर्ज शेतकऱ्यांनी भरले आहेत. पण त्यांना अजून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी श्रीरामपूर पाटबंधारे उप विभागीय कार्यालयाला काळे फासून घोषणाबाजी केली.
Published 18-Apr-2017 19:49 IST
अहमदनगर - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडूलकर यांचा एकेरी उल्लेख करत कबूतर अशी संभावना केली आहे. आसूड यात्रेच्या सभेमध्ये बच्चू कडू बोलत होते.
Published 18-Apr-2017 11:43 IST
अहमदनगर - पांगरमल बनावट दारूकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनी जिल्हा प्रशासनाला यासंबंधी आदेश दिले आहेत. तपास सीआयडीकडे वर्ग झाल्याने पोलीस तपासावर साशंकता असल्याचे बोलले जात आहे. बनावट दारूकांडात पांगरमलमधील ९ जणांचा तर जिल्ह्यात १४ जणांचा बळी गेला आहे.
Published 17-Apr-2017 13:29 IST
अहमदनगर - नेवासा येथील अण्णा लष्करे टोळीतील फरारी चार आरोपींना तेलंगणा राज्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. यापूर्वी पोलिसांच्या संरक्षणातून पळालेल्या दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Published 16-Apr-2017 10:10 IST
अहमदनगर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील आर्मड कॉर्पस् सेंटर अॅण्ड स्कूलला निशाण प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम सैनिक प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी जवानांनी राष्ट्रपतींना मानवंदना दिली.
Published 15-Apr-2017 17:20 IST | Updated 17:58 IST
अहमदनगर - अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ८५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी ३५ जणांना अटक करून ९ वाहनांसह ३० लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Published 15-Apr-2017 15:09 IST

video playविखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील
विखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे