• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - साईबाबा समाधी शताब्दीचे औचित्य साधत शिर्डीतील ग्रामस्थ आणि संस्थानच्या कर्मचाऱयांनी साई चरणी अनोखी श्रद्धा अर्पण केली आहे. ४० भविकांच्या या समुहाने श्री क्षेत्र रामेश्वर येथील २२ कुंडातील प्रवित्र जल साईंच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने तब्बल साडेसोळाशे किलोमीटरचा पायी प्रवास करत शिर्डीत घेऊन आले. यासाठी त्यांना तब्बल ४० दिवस लागले. या भाविकांनी रामेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने साईंनाMore
Published 18-Oct-2018 06:06 IST
शिर्डी - साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाची सांगता येत्या १९ ऑक्टोबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजावतरण करुन या वर्षाची सांगता होणार असल्याची माहिती साई संस्थांनचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी साई मंदिर रात्रभर खुले राहणार असून भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
Published 18-Oct-2018 00:30 IST
अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या समाधीला १८ ऑक्टोबर २०१८ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधीचे दर्शन घेणार आहेत. मोदी यांच्या हस्ते साई समाधी शताब्दी उत्सवाची सांगताही होणार आहे.
Published 17-Oct-2018 17:13 IST | Updated 17:25 IST
अहमदनगर - साईबाबांच्या शिर्डीतील दसरा उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. साईप्रतिमा, वीणा आणि साईचरित्राची साई समाधी मंदीर ते व्दारकामाईपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणाचे पठण करण्यात येऊन उत्सवाची सुरुवात झाली.
Published 17-Oct-2018 15:29 IST
अहमदनगर - समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या दिव्यांग, अनाथ मुलांना सण-उत्सवाचा आनंद लुटता यावा, यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेने रासदांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील अक्षदा गार्डनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
Published 17-Oct-2018 14:48 IST | Updated 14:50 IST
अहमदनगर - दसऱ्याच्या दिवशी (ता. १८) सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतील राष्ट्रसंत भगवानबाबांच्या २४ फुटी उंच भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. दसऱ्याला भक्तांची पावले समाधी गडाकडे वळणार की जन्मस्थळाकडे याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
Published 17-Oct-2018 13:23 IST
मुंबई - पंतप्रधान आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना शिर्डी येथे १९ ऑक्टोबर रोजी घरकुलांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच ४० हजार लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश समारंभातही ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
Published 17-Oct-2018 09:50 IST
मुंबई - धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
Published 16-Oct-2018 20:21 IST
अहमदनगर - शहरातील मनोज शिंदे आणि पूनम शिंदे या केशकर्तनकारांनी मंगळवारी एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. मनोज आणि पूनम यांनी एकाच दिवशी ८ तासात तब्बल ९७२ जणांची हेअर कटिंग केली आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि मुलांचे केस कापण्याचा विश्वविक्रम केला आहे.
Published 16-Oct-2018 17:12 IST | Updated 17:21 IST
अहमदनगर - समाजभूषण प्राप्त व सहकार महर्षी सुवालाल आनंदराम गुंदेचा (वय ८४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
Published 16-Oct-2018 09:03 IST
अहमदनगर - राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम सोमवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी मंदिर परिसरात दर्शन घेत असताना मंदिरात आलेल्या भाविकांच्या हातात प्लास्टिकची पिशवी पाहून पर्यावरण मंत्र्यांचा पारा अचानक चढला. राज्यात प्लास्टिक बंदी असताना साई मंदीरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरण मंत्र्यांनी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि,More
Published 16-Oct-2018 05:57 IST | Updated 07:08 IST
अहमदनगर - शिर्डी येथील साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ.अब्दुल कलाम आझाद यांना अभिवादन करण्यात आले आहे. ग्रंथपाल भाऊसाहेब शिंदे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके महाविद्यालयास भेट दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास शिवगजे होते.
Published 16-Oct-2018 01:54 IST | Updated 06:05 IST
अहमदनगर - राज्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत सरकार गंभीर आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज (सोमवारी) कृषी आधार संमेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
Published 15-Oct-2018 19:16 IST
अहमदनगर - येणाऱया लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिर्डीत म्हटले आहे.
Published 15-Oct-2018 19:25 IST | Updated 19:27 IST

video playसाई मंदिरात प्लास्टिक बंदीचे तीनतेरा, पर्यावरण मंत...