• नवी दिल्ली - जिनपिंग यांच्याशी खास चर्चेसाठी आज पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर
  • नाशिक - शिवसेनेत अंतर्गत वाद, राऊतांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची दांडी
  • लातूर - संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना दिला कचरा भेट
  • अकोला - संभाजी ब्रिगेडकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड
  • मुंबई - कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा मार्ग मोकळा - बडोले
  • नवी दिल्ली - लोकांनी खरे संत आणि भोंदू यांच्यात फरक करावा - अशोक गेहलोत
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये राजकीय कार्यकर्त्याची हत्या
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुस्लिमविरोधी होते, हा आरोप धादांत खोटा आहे, असे वक्तव्य खासदार, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. पै. फ्रेन्डस लायब्ररीने आयोजित केलेल्या 'ज्ञान गंगा आली अंगणी' कार्यक्रमात ते बोलत होते. भिवंडीतील मुसलमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाळासाहेबांचा त्यांच्यावर राग होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
Published 15-Apr-2018 18:15 IST | Updated 18:30 IST
ठाणे - मस्तवाल परप्रांतीय फेरीवाल्यांनी टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिराच्या रस्त्यावरील पदपथावर ठाण मांडले आहे. त्यांची मुजोरी वाढल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. एका परप्रांतीय फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published 15-Apr-2018 17:47 IST
ठाणे - कठुवा आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या समवेत माजी निवृत्त पोलीस अधिकारी शिरीष इनामदारसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Published 15-Apr-2018 11:41 IST
ठाणे - भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी कोर्ट नाका येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास शेकडो अनुयायांनी अभिवादन केले.
Published 15-Apr-2018 12:52 IST
ठाणे - मुलीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या सुनेला रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रघुनाथनगर येथे घडली आहे. दक्षा अशोक मंगे (३०) असे त्या पीडित विवाहितेचे नाव असून ती या आगीत ७० टक्के जळाल्याने तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
Published 15-Apr-2018 11:21 IST
ठाणे - डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्यानंतर आंबेडकरी जनतेत चैतन्याची लाट पसरली आहे. याचे प्रतिबिंब बहुजन समाज पक्षाने काढलेल्या रॅलीत दिसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बसपच्या वतीने डोंबिवली शहरात महारॅलीचे आयोजन केले होते. युग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या देखील यात सहभागी झाल्या होत्या.
Published 15-Apr-2018 12:14 IST
ठाणे - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपने सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र भाजपने आमचा मुका जरी घेतला, तरी आता युती होणे अशक्य आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
Published 15-Apr-2018 12:10 IST | Updated 12:41 IST

video playशिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या

video play
'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा