• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - वाढत्या उन्हाळ्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे ओढे, नाले, झरे आदी स्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. पिण्यास पाणी नसल्याने वन्यजीव तहानेने व्याकूळ झाले असून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर पडघा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जंगलातील मोरांनी पाण्यासाठी आपला मोर्चा गावांकडे वळवला आहे.
Published 13-Apr-2017 10:33 IST
ठाणे - भिवंडीतील नवसमाज विद्यामंदीर मानिवलीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पाटील (१४) हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या नववीच्या वर्गात शिकत असून ती भिवंडी तालुक्यातील मोहीली या खेडेगावात राहणारी आहे.
Published 13-Apr-2017 08:08 IST
ठाणे - उल्हासनगर शहरात भरदिवसा लुटमारींच्या घटना घडत आहेत. स्कायवॉकवर ३ जणांच्या टोळीने तरूणाला अडवून त्याच्यावर चॉपरने वार केले आणि मोबाईलसह रोख रक्कम लुटली. मोहोम्मद अब्दुल रहिम वारिसअलि शेख असे पीडित तरूणनाचे नाव आहे.
Published 12-Apr-2017 22:16 IST
ठाणे - अस्सल हापूस आंब्याच्या नावाने दुय्यम व स्वस्त असलेला ‘कर्नाटक आंबा’ विकून ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांची चक्क फसवणूक व लूट करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या हापूस आब्यांच्या नावावर लूट करणाऱ्या बंगाली टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.
Published 12-Apr-2017 19:50 IST | Updated 20:06 IST
ठाणे - नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक शहर अभियंता जी.व्हि.राव यांनी पदावनतीचे आदेश रद्द करण्याची स्थायी समितीकडे मागणी केली. उद्या यावर निर्णय होणार आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाराचा गैरवापर करून आपल्याला पदावनत केल्याचा आरोप राव यांनी त्यांच्या निवेदनात केला.
Published 12-Apr-2017 11:10 IST | Updated 11:11 IST
ठाणे - उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकृत लुटमारीचा प्रकार घडला. मुलीला सोडून घरी परतणाऱ्या एका महिलेला वाटेत अडवून तिच्या डोक्यावरील केस कात्रीने कापले व तिला बंदूकीचा धाक दाखवून २ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.
Published 12-Apr-2017 09:49 IST
ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि बिल्डर यांचे साटेलोटे एका प्रकरणातून चव्हाट्यावर आले आहे. 'ग' प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत पांडुरंगवाडी विभाग झोपडपट्टीतील महिलांनी अकरा दिवसांपूर्वी झोपड्या तोडल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Published 12-Apr-2017 08:01 IST
ठाणे - शहरीतील प्रकल्पग्रस्थांचा महत्वाचा एक प्रश्न मार्गी लागणार आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची डिसेंबर २०१५ पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे आहेत त्याच जागेवर कायम होणार असल्याची माहिती स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिल्याचे म्हात्रे म्हणाल्या.
Published 12-Apr-2017 07:23 IST
ठाणे- येथील हनुमान बावडी, कोटरगेट या परिसरात राहणाऱ्या युवतीने नारपोली परिसरातील अमजद शमीमउद्दीन शेख (२७) या तरुणाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. व्यावसायिक भागीदारीतून प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे.
Published 11-Apr-2017 22:36 IST
ठाणे - नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत अपहरण करुन लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी निव्वळ अदखलपात्र गुन्हा दाखल करीत तक्रारदाराची बोळवण केली होती. पण, ही घटना प्रसारमाध्यमांकडे येताच कोळसेवाडी पोलिसांनी याची दखल घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
Published 11-Apr-2017 20:58 IST
ठाणे - उन्हाचा पारा वाढू लागला आहे. यामुळे शेतीला लागणार्‍या पाण्याची चणचण भासू लागली. भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ लागल्याने एपीएमसी मार्केटमध्ये येणार्‍या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांचे भाव वाढू लागले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत १५ ते २० टक्के भाव वाढ झाली आहे.
Published 11-Apr-2017 10:26 IST
ठाणे - शिवसेनेच्या वतीने मंजूर झालेल्या विकास कामाच्या निधीचे सुभाष टेकडी परिसरात फलक लावण्यात आले होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी ते फलक फाडून टाकल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Published 11-Apr-2017 09:46 IST
ठाणे - पत्नीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून ठार मारून पसार झालेल्या पतीला पहाटेच्या सुमाराला शांतीनगर पोलिसांनी भिवंडीच्या गायत्री नगरमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आयुब खान (५०) आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.
Published 11-Apr-2017 08:21 IST
ठाणे - उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर चालताना अनेक खड्ड्यांतून वाट काढत चालावे लागते. वाहन, चालक, पादचारी रस्त्याने चालताना मेटाकुटीस येत असतात. असे असताना येथील मध्यवर्ती रूग्णालयात महिलेला प्रसुतिसाठी रिक्षातून आणले जात होते. मात्र, खड्डेमय रस्त्यांमुळे रूग्णालयाच्या आवारातच या महिलेची प्रसुती झाली.
Published 10-Apr-2017 23:01 IST

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण