• लंडन : ब्रिटनच्या संसदेसमोर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी 'आयसिस'ने स्वीकारली
  • नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब
  • सातारा : उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
  • मुंबई : संपावर गेलेले १५२ डॉक्टर कामावर रुजू
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - भिवंडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आत्माराम सखाराम गुळवी याचे हृदयविकाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. (आज) मंगळवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुगणालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Published 14-Mar-2017 21:03 IST
ठाणे - भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत अटीतटीची लढत झाली. सभापतीपदी शिवसेनेचे अनंता दुदाराम पाटील तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंता भागोजी पाटील यांची निवड मंगळवारी करण्यात आली. बाजार समितीच्या सत्तेत प्रथमच शिवसेनेला शिरकाव करण्याची संधी मिळाल्याने शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. भाजपचे दयानंद दुदाराम पाटील यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने भाजप गटात शांतता पसरली होती.
Published 14-Mar-2017 20:15 IST
ठाणे - नोटबंदीच्या निर्णयाला दोन महिन्यांचा कालावधी उलटला. तरी जुन्या नोटा आणि नवीन नोटांचा खेळ काही अजून संपलेला नाही. कल्याणमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या तब्बल २० लाख २७ हजार रुपयांच्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या ४ जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Published 14-Mar-2017 18:12 IST
ठाणे - एकीकडे दिवसाढवळ्या घरे फोडणाऱ्या चोरांचा माग काढण्यात कल्याण-डोंबिवलीचे पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीकरांना हैराण करून सोडणाऱ्या आणि पोलीस खात्याची झोप उडविणाऱ्या दोघा अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहे. महात्मा फुले चौकीच्या पोलिसांनी यश मिळविले आहे.
Published 14-Mar-2017 17:58 IST
ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून २७ गावे वगळण्याच्या मागणीसाठी भाजपने संघर्ष समितीशी आघाडी केली आणि नगरसेवक निवडून आणले. मात्र आता हेच नगरसेवक महापालिकेतून २७ गावे वगळण्यास विरोध करत असून या नगरसेवकांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीने दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Published 14-Mar-2017 12:54 IST
ठाणे - बंजारा समाजातील संस्कृतीचे जतन करत, टिटवाळ्यातील बंजारा समाजाच्या वतीने 'लेंगी' महोत्त्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात बंजारी समाजाचे समाज शेकडो बांधव व भगिनी पारंपारीक वेशभुषेत सहभागी झाले होते.
Published 14-Mar-2017 08:18 IST
ठाणे - उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्या गळाला लागलेल्या साई पक्षाला शिवसेनेने महापौर पदाची ऑफर दिली आहे. यामुळे भाजपबरोबर गेलेला साई पक्ष हा महापौर पदाच्या निवडणुकीपुर्वी शिवसेनेच्या गोटात येतो का? याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.
Published 13-Mar-2017 21:45 IST
ठाणे - महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय वैमन्यस्यातून मुंब्रात एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मदन आणि महेश नावाच्या आरोपींना अटक केली आहे.
Published 13-Mar-2017 20:48 IST
ठाणे - घरासमोर पत्ता खेळण्यास नकार दिल्याने २ जणांवर चाकू आणि लोखंडी सळईने मारहाण झाला आहे. पुर्णा येथील दालमिल कंपाऊंडमध्ये ही घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी ४ जणांना आज (सोमवारी) सायंकाळी अटक केली आहे.
Published 13-Mar-2017 21:08 IST
ठाणे - बँक ऑफ बरोडा बँकेच्या एटीएममधून तब्बल २९ लाख ७० हजार ८०० रुपयांच्या चोरीची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. चोरी करणारे चोर दुसरे कोणी नसून एटीएममध्ये कस्टोडीयन पदावर काम करणारेच चोर असल्याच्ये निष्पन्न झाल्याने नारपोली पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.
Published 13-Mar-2017 20:15 IST
ठाणे-टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजीत "देशाला गरज एका अर्थक्रांतीची" या व्याख्यानाच्या निमित्ताने अनिल बोकील यांनी पंचसुत्रीवर आधारीत अर्थक्रांतीचा प्रस्ताव विषद केला.
Published 13-Mar-2017 18:15 IST | Updated 18:53 IST
ठाणे - बहुजन समाज पक्षाच्या वतीने डोंबिवलीमध्ये ईव्हीएम मशीनची होळी करण्यात आली. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला होता, असा आरोप मायावती यांनी केला आहे.
Published 12-Mar-2017 22:52 IST
ठाणे - सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ४ सोन्यांच्या बिस्किटांच्या तुकडयाचे नोकराने अपहार केल्याची घटना बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Published 12-Mar-2017 21:07 IST
ठाणे - उल्हासनगरातील हॉटेल चांदणी बारच्या करारावरुन उद्भवलेल्या भांडणात १० ते १२ जणांच्या टोळीने हॉटेलमध्ये तोडफोड केली. या टोळीने हॉटेल व्यवसायिक, वॉचमॅन व सफाई कामगार यांनाही मारहाण केली.
Published 12-Mar-2017 21:01 IST

video play
'मिसेस ४२०'चा आणखी एक प्रताप उघड, वकील असल्याचे...
video playपत्नीचे स्तन कापून हत्या करणारा पती गजाआड
पत्नीचे स्तन कापून हत्या करणारा पती गजाआड

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

हे व्यायामप्रकार करुन उन्हाळ्यातही राहा फिट
video playही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी
ही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी

video playरजनीकांतच्या
रजनीकांतच्या '2.0' च्या सेटवर पत्रकाराशी गैरवर्तन