• मुंबई- चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर मार्ग विस्कळीत
  • गुजरात निवडणूक- दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
  • नागपूर- हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधकांचा सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा
  • नागपूर- काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचे शरद पवार करणार नेतृत्व
  • न्यूयॉर्क - टाइम्स स्क्वेअरजवळ स्फोट, संशयित ताब्यात
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - एका दाम्पत्याने चार चाकी गाडीसाठी तब्बल ११ लाख रुपये कर्ज घेतले. यामधील ३ लाखांचा भरणा केला. मात्र उर्वरित रक्कम परत न करता गाडी घेऊन पसार झाल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती. सिद्धार्थ व सीमा रेथरेकर असे या दाम्पत्याचे नाव असून पोलीस या फरार पती-पत्नीचा गाडीसह शोध घेत आहेत.
Published 03-Dec-2017 17:59 IST
ठाणे - बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजीचे आयोजन करुन या झुंजीत बैलांना निर्दयीपणे वागणूक देण्यात आली. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांवर प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 03-Dec-2017 17:33 IST
ठाणे - आडीवली येथील रिक्षाचालक खून प्रकरणाचा मानपाडा पोलिसांनी २४ तासांच्या आत छडा लावला आहे. सीताराम गुप्ता असे हत्या करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रेयसीच्या छेडछाडीच्या वादातून त्याचा मित्र अर्षद खान याने त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अर्षद खान याला अटक केली आहे.
Published 03-Dec-2017 16:53 IST
ठाणे - कळवा परिसरात घराचे अतिरिक्त बांधकाम करण्यास विरोध करत एका महिलेच्या घरात शिरुन धमकावल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महेश साळवी याला अटक केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने साळवी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, साळवीला अटक केल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 03-Dec-2017 11:17 IST
ठाणे - महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पालिकेने शहरातील अपंगांना वाऱ्यावर सोडले आहे. १९९५ सालापासून अपंग कायदा होऊनही त्या कायद्यानुसार अपंगांसाठी खर्च करावयाचा १२८ कोटींचा निधी इतरत्र दुसऱ्या कामासाठी वापरला गेल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Published 03-Dec-2017 09:59 IST
ठाणे - कळवा पूर्व येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
Published 02-Dec-2017 22:48 IST | Updated 23:03 IST
ठाणे - काही जण मारहाण आणि पैसे मागतील या भीतीने एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी सचिन माने, मन्या, राहुल आणि डेव्हिड या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Published 02-Dec-2017 22:41 IST
ठाणे - फेरीवाल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, मनसे व सत्ताधारी भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अशातच मनसेच्या पदाधिकाऱ्याने भाजीविक्रेत्या महिलेला हप्ता मागितल्याचा व विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील मनसेच्या पदाधिकाऱ्याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास जाधव असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
Published 02-Dec-2017 22:40 IST | Updated 22:41 IST
ठाणे - भिवंडी शहरातील मुस्लीम बांधवांनी ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त आज भव्य मिरवणूक काढली. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जय जयकार करुन मानवजातीच्या कल्याणासाठी सामूहिक रित्या कोटरगेट मशिदीत नमाज अदा करुन सुखशांतीसाठी मुस्लीम बांधवांनी दुवा मागितली.
Published 02-Dec-2017 21:23 IST
ठाणे - रेल्वे रुळालगत खेळत असताना कर्जत लोकल गाडीची धडक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर येथे घडली आहे. रोशना कुमार चौहाण, असे या चिमुकलीचे नाव आहे.
Published 02-Dec-2017 20:03 IST
ठाणे - पिस्तुलाचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. २२ ऑक्टोबरला भिवंडी वाडा महामार्गावरील वारेट गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 02-Dec-2017 20:09 IST
ठाणे - कल्याणमतील आग्रा रोडवरील एका पेट्रोलपंपावर मनसेच्या कार्यकत्यांना भेसळयुक्त पेट्रोल दुचाकीमध्ये भरल्याचे लक्षात आले. या कार्यकर्त्यांनी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह पेट्रोलपंपावर धाव घेतली. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. या घटनेचे गांभीर्य ओळखून बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा पेट्रोल पंप शुक्रवार दुपारपासून बंद करण्यात आला असून तेथील पेट्रोलचे नमुनेMore
Published 02-Dec-2017 10:00 IST
ठाणे - पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
Published 02-Dec-2017 07:28 IST
ठाणे - डोंबिवलीमध्ये एका ९ वर्षाच्या बालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. भूषण सरोदे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.
Published 02-Dec-2017 07:10 IST

video playलग्नाच्या आमिषाने विधवेवर अत्याचार, बळजबरीने केला...
लग्नाच्या आमिषाने विधवेवर अत्याचार, बळजबरीने केला...

खोकला झालाय तर चॉकलेट खा
video playअनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
अनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
video playऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय
ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय

video play
'धाकड गर्ल' छेडछाड प्रकरणी विकास सचदेवला अटक
video play
'चिठ्ठी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत धनश्री काडगावकर !