ठाणे - कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला गुरुवारी पुन्हा एकदा भीषण आग लागली होती. खाडीकडील दिशेला असलेल्या कचऱ्याला लागलेल्या या आगीचा धूर शहरात सर्वत्र पसरला होता. अखेर तब्बल २१ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डम्पिंग ग्राउंडवरील आग आटोक्यात आणण्यात आली. आज (शुक्रवारी) दुपारी १ च्या सुमारास संपूर्ण आग विझविण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
Published 20-Apr-2018 17:01 IST | Updated 17:04 IST