• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - एनआरसी कंपनीचे दिवाळे काढून कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. या मागणीसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय रविवारी मोहोने येथे कामगारांच्या सभेत घेण्यात आला. नालंदा बुध्द विहार येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया इंडस्ट्रियल अँड जनरल वर्कर्स युनियनच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
Published 17-Oct-2017 07:08 IST
ठाणे - खराब रस्त्यांमुळे खारघरमधील उत्सव चौकाजवळ एका महिलेचा अपघातात नाहक बळी गेला. शिल्पा पुरी असे या महिलेचे नाव असून, ती खारघर येथील रहिवासी होती.
Published 16-Oct-2017 22:46 IST | Updated 22:50 IST
ठाणे - चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी कल्याण-डोंबिवलीकर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. यामुळे बाजारात सर्वत्र ग्राहकांची गर्दी लोटली आहे. बहुतांश कर्मचारी, कामगारांचे वेतन-बोनस हाती पडल्यानंतर मंगळवारपासून गर्दी आणखी वाढणार हे नक्की आहे.
Published 16-Oct-2017 21:02 IST
ठाणे - पक्षाचे ६ नगरसेवक शिवबंधनात अडकल्यानंतर राज ठाकरे कमालीचे सावध झाले आहेत. आगामी काळात पक्षाला होणारा दगा-फटका टाळण्यासाठी ते अन्य शहरातील पक्षाच्या नगरसेवकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे लवकरच कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published 16-Oct-2017 20:38 IST
ठाणे - कोपरखैराणे सेक्टर १९ मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री घरगुती गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करताना स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील दाम्पत्यासह गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आलेला कामगार गंभीररित्या जखमी झाला. या तिघांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
Published 16-Oct-2017 20:17 IST | Updated 20:53 IST
ठाणे - भिवंडी तालुक्यातील काट्ई गावातील दिवाणमाळ या आदिवासी पाड्यात पतीने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. यातच पत्नीचा मृत्यू झाल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह घरापासून काही अंतरावर जमिनीत पुरला. हा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे उघडकिस आला आहे.
Published 16-Oct-2017 17:01 IST
ठाणे - विकासकामाचे श्रेय लाटण्याचा वादातून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आपापसात भिडल्याचा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. एकमेकींच्या झिंज्या उपटण्यापर्यंतचा हा वाद कल्याण पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ९९ मध्ये घडला. अखेर, पोलीस ठाण्यात जाऊन हा वाद थंडावला. मात्र, या दोन्ही नगरसेविकांनी एकमेकींच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
Published 16-Oct-2017 16:46 IST
ठाणे - मुंबईतील मनसे नगरसेवकांबाबत निर्णय घेताना आपलीही बाजू ऐकून घेण्यात यावी, म्हणून मनसेने आज कोकण आयुक्तांना पत्र दिले. शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांची अद्याप कोकण आयुक्तालयात नोंदही न झाल्याचे मनसेने म्हटले आहे.
Published 16-Oct-2017 13:51 IST
ठाणे - अंबरनाथ - बदलापूर रस्त्यावर रविवारी दुपारी पाच दुचाकीस्वार तरुणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तीन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
Published 16-Oct-2017 07:58 IST
ठाणे - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत टिटवाळा युथच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद तसेच डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्यातून प्रेरणा आणि आदर्श घेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Published 15-Oct-2017 22:50 IST
ठाणे - दिवाळी हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. मात्र समाजातील काही घटक या आनंदापासून आर्थिक विषमतेमुळे वंचित राहतात. या आनंदाच्या सणानिमित्ताने आपल्यासारखेच आनंदाचे क्षण या वंचित घटकांच्या जीवनातही यावेत व क्षणभर का होईना त्याचा आनंद त्यांना लुटता यावा, असा विचार करत 'घे भरारी' हा ग्रूप तयार झाला.
Published 15-Oct-2017 22:05 IST
ठाणे - दिवाळीचा किल्ला बनविण्यासाठी मित्रांसोबत माती आणायला गेलेल्या एका बालकाचा खाणीमधील साठलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मातीने माखलेले हात धुत असताना डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात रविवारी दुपारी ही घटना घडली. इकारार हुसैन (११) असे त्या मृत बालकाचे नाव आहे.
Published 15-Oct-2017 22:13 IST | Updated 22:38 IST
ठाणे - दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी भिवंडी निजामपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा आयुक्त डॉ. योगेश म्हसे व महापौर जावेद दळवी यांनी केली आहे. मात्र ६ हजार रुपयांचा बोनस म्हणजे बोळवण असल्याची भावना कामगारांमध्ये आहे
Published 15-Oct-2017 21:54 IST
ठाणे- एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर चर्नीरोड स्टेशन परिसरातील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर ठाकुर्ली येथील जुन्या पादचारी पुलावरील तिकीट घराचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली.
Published 15-Oct-2017 19:30 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव