या पुरस्कारांमध्ये साहित्य-पत्रकारितेसाठी 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणास लावून अदभूत अशी शूरविरता दाखविणाऱया व्यक्तीला 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार', आपल्या अतुल्य कलागुणाने महाराष्ट्राच्या नावाला देश-परदेशात लौकिक मिळवून देणाऱया व्यक्तीला 'छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार', ने गौरवण्यात येते. याबाबत माहिती अॅड. बी. एल. शर्मा. यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यंदाच्या सत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्र यांना 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणार्थ कश्मीर येथे अतिरेकींचा सामना करताना भारतमातेच्या सेवेत आपले प्राण अर्पित करणारे लष्कर दलाचे शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' तर नामवंत ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांना 'छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. समारंभाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति कमळकिशोर तातेड व न्यायमूर्ति मकरंद कर्णिक यांच्या हस्ते दिप प्रज्ज्वल करून करण्यात येईल.
या प्रसंगी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (आयपीएस) व कोकण निभागिय विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज (आयपीएस) हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थीत असतील. ठाणे जिल्हा वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश भोसले, 'राजस्थान पत्रिका'चे (मुंबई) संपादक डॉ. उरुक्रम शर्मा व ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक अजिताभ बच्चन यांची कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळ्यात होणाऱया राष्ट्रीय कवी संमेलनाचे सुत्र-संचालन ज्येष्ठ विनोदसम्राट कवी सत्यनारायण सत्तन हे करणार आहेत. या प्रसंगी पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे (रायपूर), प्रताप फौजदार (आग्रा), आशीष 'अनल' (लखीमपूर-खीरी), गजेंद्र प्रियांशू (बाराबंकी), गौरव चौहान (इटावा), गौरव शर्मा आणि डॉ. भुवन मोहिनी (उज्जैन) आदी मान्यवर कवी आपआपल्या काव्यरचना ही सादर करणार आहे. या कार्यक्रमाच्या समारंभात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शर्मा यांनी लोकांना केले आहे.