किशोर अनंता पाटील (२८) आणि महादेव पाटील (३०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी किशोर पाटील यांचा मोबाईल सागर कुरे याने चोरला असा संशय घेण्यात आला होता. त्यावरुन त्यांच्यात धुसफूस सुरू होती. आज सायंकाळच्या सुमारास किशोर मावशीकडे जेवणासाठी जात होता. त्यावेळी राजू कुरे व त्याची दोन मुले सागर आणि जितेश यांनी सुभाषचंद्र बोस ऑफिससमोर किशोर याला बेदम मारहाण केली.
मारहाणीतून सुटका करण्यासाठी मित्र महादेव पाटील धावून गेला असता. त्यालाही लोखंडी सळई व कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. या मारहाणप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तिघा बापलेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघेही बापलेक फरार झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करत आहे.