• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - राज्यात आसूड आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गुजरातपर्यंत धडकणारे बच्चू कडू आता शहरी प्रश्नावरही तुटून पडणार आहेत.
Published 27-Apr-2017 20:41 IST
ठाणे - फळविक्रेत्याकडून १० हजार रुपयाची लाच घेताना पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अमोल दहिवले (वय ४५) असे या लाचखोर आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे.
Published 27-Apr-2017 20:22 IST
ठाणे - तांदूळ विक्रेत्याकडून सलग २ वर्ष तांदूळ खरेदी करुन पैसे न देता तब्बल ५४ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Published 27-Apr-2017 18:48 IST
ठाणे - सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह ३ जणांनाच्या विरोधात २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सिनेजगतात एकच खळबळ माजली आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
Published 27-Apr-2017 15:51 IST | Updated 21:27 IST
ठाणे - न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला बोगस मतदारांची नावे कमी करण्याचे आदेश देऊन ५ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयातील न्या. नरेश पाटील आणि न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांच्या खंडपीठाच्या निर्णयामुळे पालिका निवडणुकीवरील संकट टळले आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणेच निवडणूक होईल, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.
Published 26-Apr-2017 22:41 IST
ठाणे - समृद्धी महामार्गाला आमचा कायम विरोध राहणार असून राज्य सरकारने यापुढे समृद्धीचा हेका सोडला नाही, तर शहापूर तालुक्यातील ५ धरणातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा खंडीत करूच असा इशारा शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Published 26-Apr-2017 22:16 IST | Updated 22:25 IST
ठाणे - मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आज शहापूर येथील मुंबई-नाशिक महामार्गावर जोरदार चक्काजाम आंदोलन केले. यानंतर स्वतःला अटकही करवून घेतली. अटक केलेल्यांना दुपारी दोन नंतर सोडून देण्यात आले.
Published 26-Apr-2017 19:11 IST | Updated 20:07 IST
ठाणे - वाशितील विशूदास भावे नाट्यगृहाच्या दुरावस्थेविरोधात मनसेने आगळेवेगळे आंदोलन केले. मनसे सैनिकांनी नाट्यगृहाच्या सभागृहात पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्या व नाट्यगृहाच्या अनेक समस्यांचा पाढा प्रसार माध्यमांसमोर वाचला.
Published 26-Apr-2017 16:01 IST
ठाणे - डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रोबेस कंपनीमध्ये गेल्या वर्षी २६ मे रोजी भीषण स्फोट होऊन १२ नागरिक ठार झाले. तर २६५ नागरिक जखमी होऊन शेकडो घरे, कारखाने आणि दुकानांचे नुकसान झाले. तरीही शासनाची कोणतीही मदत दुर्घटनाग्रस्तांना मिळाली नाही. त्यामुळे या दुर्घटनेच्या जखमा अजूनही ओल्याच असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
Published 26-Apr-2017 09:59 IST
ठाणे - होणारा नवरा हुंडा मागतो म्हणून अशा नवऱ्यालाच लाथाडण्याचे धैर्य एका शेतकरी कन्येने दाखवले. ललिता ठाकरे असे या उपवर मुलीचे नाव आहे. गावकऱ्यांनी तिने उचललेल्या धडाकेबाज पाऊलाबद्दल कौतुक केले आहे.
Published 26-Apr-2017 00:15 IST
ठाणे - गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी बालोद्यानातील मोराची गाडी दुरूस्त करून ती सुरू करण्याची तयारी प्रशासन करत असतानाच मंगळवारी मात्र भाजपने या कामाच्या श्रेयासाठी या कामावर डल्ला मारला. कल्याण-डोंबिवली महापालिकेला विश्वासात न घेताच भाजपने परस्पर कामाला प्रारंभ केला आहे. मनसे आणि भाजपामध्ये सध्या श्रेयाची लढाई सुरू असून त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
Published 25-Apr-2017 21:09 IST
ठाणे - एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेची घरात घुसून धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार घराशेजारील नागरिक खिडकीतून पाहत होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज न्यायालयाने २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published 25-Apr-2017 22:37 IST | Updated 22:38 IST
रायगड - शिवसेना भाजपा युती होणार की नाही हे अजून निश्चित नाही. मात्र शिवसेनेने स्वबळाची चाचपणी म्हणून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याला सुरुवात केली आहे. परंतु अद्याप युतीबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.
Published 25-Apr-2017 20:55 IST
कल्याण - काही दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलिसांचे एक पथक कल्याण-कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन जवळील इराणी कबिल्यात लपलेल्या एका अट्टल चोरास पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील इराणी महिलांनी या पोलिसांवर पेट्रोल मिश्रीत रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात फरार आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
Published 25-Apr-2017 20:07 IST

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे