• पुणे- शार्दूल जाधव यांना 'अजित युवा पुरस्कार' जाहीर
  • पुणे- निगडी पोलिसांकडून पहाटे २ गुन्हेगारांना अटक, २ पिस्तूल जप्त
  • नागपूर- युग चांडक प्रकरण : अल्पवयीन आरोपी दोषी,आज निकाल
  • जम्मू-पठाणकोट रस्त्यावर अपघात, १ ठार तर २२ जण जखमी
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - देशाला हादरवून सोडणाऱ्या पेट्रोल पंप घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार प्रकाश नूलकर याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्याने तब्बल ४० वेळा परदेशवारी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तो २५ देशात फिरला असल्याचेदेखील समोर आले आहे.
Published 21-Jul-2017 10:24 IST
ठाणे - बाहुबली चित्रपटात दाखवल्याप्रमाणे उंच धबधब्यावरून उडी मारण्याच्या नादात तरुणाला जीव गमवावा लागला. एका पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात तरुणाची उडी कैद झाली आहे. ही त्याची शेवटचीच उडी ठरली. इंद्रपाल पाटील (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भिवंडी तालुक्यातील आमणे गावाचा रहिवासी होता.
Published 20-Jul-2017 22:53 IST
ठाणे - स्टेशन परिसरातील स्याटीस पुलाच्या खाली तस्कर बिबट्याची कातडी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळली. यानंतर केलेल्या कारवाईत ५९ वर्षीय रामचंद्र भुसारे याला अटक करण्यात आली आहे. भुसारे मुळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Published 20-Jul-2017 22:51 IST
ठाणे - गांजाची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने कळवा परिसरातील अमित गार्डन येथून अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचा एकूण ४३ किलो (८०० ग्राम) वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
Published 20-Jul-2017 22:10 IST
ठाणे - देशभरातील परिवहन विभागात बेसुमार वाढलेला भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन कार्यालय दलाल मुक्तीचा संकल्प केला. त्यासाठी आरटीओ संबंधित कामे ऑनलाईन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाला ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. याचेच उदाहरण आज पाहायला मिळाले.
Published 20-Jul-2017 21:54 IST
ठाणे - मुलीसोबत खेळण्यासाठी आलेल्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून नराधमाने तिचा विनयभंग केला. ही घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 20-Jul-2017 21:48 IST
ठाणे - कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची याच परिसरात राहणाऱ्या नितीन जाधव (२८) याच्याशी ओळख होती. ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत व पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून सतत ३ वर्ष नराधम नितीनने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
Published 20-Jul-2017 17:25 IST | Updated 17:26 IST
ठाणे - सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. येथील दुर्गाडी किल्ल्याचे मूळ स्वरूप स्पष्ट होईल असे अवशेष उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा किल्ला 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित करता येणार नसल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. या उत्तराने दुर्गप्रेमी आचंबीत झाले आहेत.
Published 20-Jul-2017 16:22 IST | Updated 17:39 IST
ठाणे - लोकप्रतिनिधींनी प्रभागात कामे होत नसल्याप्रकरणी तब्बल ५ तास सभागृहात चर्चा करून प्रशासनाला धारेवर धरले होते. विकासकामे होत नसल्याची ओरड करणार्‍या लोकप्रतिनिधींना आयुक्त रामास्वामी एन यांनी सडेतोड उत्तर देऊन निरूत्तर केले.
Published 20-Jul-2017 08:50 IST
ठाणे - मेहुणीशी प्रेमसंबंध ठेवून सासरवाडीच्या लोकांना नाहक त्रास देणाऱ्या तरुणाचा भाऊजीने भररस्त्यात धारदार चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना भिवंडीतील नेहरूनगर नवीवस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. अबू शाहिद शेख (२९ रा. नेहरुनगर, भिवंडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी शमीम याला न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
Published 20-Jul-2017 08:26 IST
ठाणे - भिवंडीत अजूनही आगीचे सत्र सुरूच आहे. एका केमिकल गोदामाला भीषण आग लागून त्यात ३ कामगार जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
Published 20-Jul-2017 07:50 IST
ठाणे - सोसायटी मेंटेनन्स खर्चाची चुकीची आकडेवारी सादर करत खर्चाच्या रकमेत खाडाखोड करून शासनाचा आयकर बुडवल्याचे उघड झाले. याप्रकरणी मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे गोत्यात आले आहेत. त्यांच्यासह सोसायटीचे चेअरमन मुकुंद इनामदार तसेच १० ते १२ सदस्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Published 19-Jul-2017 20:03 IST | Updated 20:06 IST
ठाणे - आंबिवली रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमधून उतरताना एक तरुण पाय सटकल्याने लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला. मात्र लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर जास्त असल्याने सुदैवाने हा तरुण बचावला. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
Published 19-Jul-2017 19:26 IST | Updated 19:31 IST
ठाणे - दोन सख्ख्या बहिणींच्या असाह्यतेचा फायदा घेत एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधमाला गजाआड केले असून जावेद शेख असे त्याचे नाव आहे.
Published 19-Jul-2017 19:18 IST

सनी लिओनी