• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
मुख्‍य पानMoreराज्यMoreसिंधुदुर्ग
Redstrib
सिंधुदुर्ग
Blackline
सिंधुदुर्ग - आपल्या कार्यकाळात अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ म्हणून प्रसिद्धी पावलेले पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. गावकर यांच्या जागी बीड येथील अप्पर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार अशोक गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published 28-Apr-2017 17:16 IST
सिंधुदुर्ग - काँगेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी आज आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'ओमगणेश' बंगल्यावर मॅरेथॉन बैठक घेतली. राणेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तब्बल ३ तास चर्चा केली. परंतु ही चर्चा कशाविषयी झाली, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र २५ रोजी महत्त्वाची भूमिका जाहीर करणार असल्याचे राणेंनी सांगितले.
Published 23-Apr-2017 18:49 IST
सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) कणकवलीत महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नारायण राणेंच्या ओमगणेश बंगल्यावर ही बैठक होणार आहे. राणे भाजप प्रवेशाबद्दल काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published 23-Apr-2017 00:15 IST | Updated 15:05 IST
सिंधुदुर्ग - किनारपट्टीवर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनामुळे समुद्री पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरक्षित सागरी पर्यटनासाठी आगामी काळात गोवा, गणपतीपुळे येथे सुरक्षा यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे दिली.
Published 18-Apr-2017 22:10 IST | Updated 22:55 IST
सिंधुदुर्ग - समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना वायरी घडल्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून किनाऱ्यावर दोन वॉच टॉवर उभारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Published 16-Apr-2017 08:14 IST
सिंधुदुर्ग - समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना सिंधुदुर्गजवळील वायरी किनाऱ्यावर घडली आहे. ११ जण बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्‍यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण बेळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्‍यापक आहेत.
Published 15-Apr-2017 14:03 IST | Updated 17:17 IST
सिंधुदुर्ग - ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ल्यांपैकी एक सिंधुदुर्ग किल्ला. या किल्ल्याच्या 'त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या' सांगता समारंभाला, मंगळवारी प्रारंभ झाला. हनुमान जयंतीच्या तिथीनुसार यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
Published 12-Apr-2017 14:44 IST
सिंधुदुर्ग - गेल्या काही दिवसांपासून उष्मामध्ये वाढ झाली आहे. काही दिवस ढगाळ वातावरण असतानाच आज कुडाळ तालुक्यातील माणगाव गावात अचानक पिवळा पाऊस पडला.
Published 06-Apr-2017 16:47 IST
सिंधुदुर्ग - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनीही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. या भेटीगाठीच्या सत्रामुळे चर्चेला उधाण आले आहे.
Published 05-Apr-2017 07:35 IST
सिंधुदुर्ग - राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची आज भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Published 02-Apr-2017 19:46 IST
सिंधुदुर्ग - सर्वोच्च न्यायालयाने बीएस ३ इंजिनच्या गाड्यांवर बंदी घातल्याने ग्राहकांना खरेदीत मोठी सुट मिळाली. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गाड्या घेतल्या आहेत. ३० व ३१ मार्च रोजी जिल्ह्यात २६६ वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी. जी. खंडागळे यांनी दिली.
Published 02-Apr-2017 14:41 IST
सिंधुदुर्ग - निर्मल सागर तट अभियानाच्या ढिसाळ नियोजनाचा अनुभव आज जिल्हावासियांना आला. निर्मल सागर तट अभियान कार्यक्रमास हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या व्यक्तींची उपस्थिती होती.
Published 29-Mar-2017 17:28 IST
सिंधुदुर्ग - जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची असते. मात्र या सभेकडे खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे यांनी पाठ फिरवली. तर अवघ्या दीड तासात जिल्हा नियोजन समितीची सभा गुंडाळण्यात आली. यावेळी या सभेत प्रमोद जठार आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
Published 28-Mar-2017 12:26 IST
सिंधुदुर्ग- कसालवरुन मालवणच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने २५ वर्षीय तरुणीला जोराची धडक दिली. या धडकेत ती तरुणी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ६ च्या दरम्यान घडली. प्रतीक्षा प्रकाश चव्हाण असे त्या तरुणीचे नाव असून अपघातानंतर चालक पसार झाला. मात्र संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
Published 27-Mar-2017 20:45 IST

video playनारायण राणेंची आज भाजप प्रवेशाची घोषणा..?
नारायण राणेंची आज भाजप प्रवेशाची घोषणा..?
video playपोलीस अधीक्षक गावकर यांची नागपूर येथे बदली
पोलीस अधीक्षक गावकर यांची नागपूर येथे बदली

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे