• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
मुख्‍य पानMoreराज्यMoreरत्नागिरी
Redstrib
रत्नागिरी
Blackline
रत्नागिरी - तूझं माझं जमेना आणि तूझ्यावाचून करमेना ही म्हण सासू आणि सुनेच्या नात्यासाठी वापरली जाते. त्या सासू-सूनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना चिपळूण तालुक्यातील वालोपे गावात घडली आहे. सासूने स्वत:च्या सुनेला चाकूने भोसकून तिची हत्या केली आहे.
Published 29-Apr-2017 14:30 IST
रत्नागिरी - राज्यात मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यात यावेत. त्यासह अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Published 29-Apr-2017 11:13 IST
रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील दोन मित्रांनी शेतीशी निगडीत कोणतेही शिक्षण नसताना अशक्य असा सूर्यफुलाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला. भालचंद्र सप्रे आणि उदय पाध्ये या तरूणांनी सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला आहे. १२ गुंठ्यात कोकणातील मातीतून ८०० किलो सूर्यफुलांच्या बियांपासून तेल निर्मितीचा प्रयोग देखील ते करणार आहेत.
Published 29-Apr-2017 10:40 IST | Updated 11:57 IST
रत्नागिरी - नगर परिषदतर्फे आयोजित 'रत्नागिरी पर्यटन महोत्सव' सध्या चांगलाच वादात सापडला आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष नागरसेवकांनी पर्यटन महोत्सवात वादाची ठिणगी टाकली. सर्वांना सोबत घेवून महोत्सव पार पाडू हा नगराध्यक्षांचा दावा आज तरी फोल ठरताना दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांनी नाराजीचा सुर उमटवत थेट महोत्सवावरच बहिष्कार टाकला आहे.
Published 28-Apr-2017 22:07 IST
रत्नागिरी - बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर्सवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस उपाधीक्षक (गृह) यांची नोडल अधिकारी म्हणून पोलीस अधिक्षकांकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Published 27-Apr-2017 20:40 IST
रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीला राज्यातली पहिली डिजिटल रक्तपेढी होण्याचा बहुमान मिळाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडिया बनवण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला साद घातली आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाने.
Published 27-Apr-2017 20:21 IST
रत्नागिरी - जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर आता केवळ ५ रुपयात लाईफ जॅकेट मिळणार आहेत. सिंधुदूर्गातल्या वायरी समुद्रकिनारी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. या दुदैवी घटनेनंतर रत्नागिरीतल्या प्रशासनाला जाग आली असून रत्नागिरीतल्या भाट्ये, गणपतीपुळे, मालगुंड, आरेवारे अशा विविध किनाऱ्यांवर केवळ ५ रुपयात लाईफ जॅकेट उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
Published 26-Apr-2017 21:17 IST
रत्नागिरी - कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूण तालुक्यातल्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे. गावचे ग्रामदैवत असलेल्या केदारनाथाच्या भेटीला एक दोन नव्हे तर तब्बल २१ पालख्या येतात. या पालख्यांची होणारी भेट पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात.
Published 26-Apr-2017 20:21 IST
रत्नागिरी - शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झाली, तर सरसकट सर्वच शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी केली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
Published 26-Apr-2017 19:47 IST
रत्नागिरी - माणसाच्या मनातील वासनाच माणसाला सैतान बनवते. असाच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार भोके गावात घडला आहे. येथे एका १६ वर्षीय गतीमंद मुलीवर गावातीलच चार नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामिण पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे.
Published 24-Apr-2017 22:39 IST
रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील रानवी-धोपावे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. दाभोळच्या फेरीबोटीला जोडणारा हा रस्ता आहे. गेल्या १० वर्षांपासून येथील ग्रामस्थ या रस्त्यासाठी लढा देत आहे. मात्र त्याकडे ना राजकारणी लक्ष देताना दिसतात ना प्रशासन. रस्त्या खराब झाल्याने एसटी प्रशासनाने एसटी सेवाही बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे तसेच ग्रामस्थाचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी आताMore
Published 24-Apr-2017 22:17 IST
रत्नागिरी - जैतापूर अणू उर्जा प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाची एक वीटही सरकारला लावू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात या मुद्द्यावर पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
Published 24-Apr-2017 18:15 IST
रत्नागिरी - प्रदूषण टाळून उर्जानिर्मिती करता येते, हे जिल्ह्यातील युवकाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे कोकणातील भौगोलिक रचनेमुळे असलेल्या उताराचा वापर करुन रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावातील विनायक बंडबे यांनी सर्वांनाच अचंबित केले आहे.
Published 24-Apr-2017 14:49 IST
रत्नागिरी - कोकणात धरणे झाली, करोडो रूपयांचा या धरणांवर खर्च झाला, मात्र या प्रकल्पग्रस्तांची अवस्था अतिशय बिकट आहे. खेड तालुक्यातील पोयनार धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांची देखील तीच अवस्था आहे.
Published 24-Apr-2017 11:54 IST

आयटीआयच्या उद्घाटनानिमित्त दोन राजकीय विरोधक एकाच...
video playमाणुसकीला काळीमा ! अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक...
माणुसकीला काळीमा ! अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक...

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे