• मुंबई - खार स्टेशनवर जलद लोकलच्या पेंटाग्राफला आग, जीवितहानी नाही
  • सातारा- महाबळेश्वरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू
  • पुणे : माओवाद्यांशी संबंधित ५ जणांवर ५१६० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने विधानमंडळ समित्यांचे राज्यातील पूर्वनियोजित तसेच परवानगी घेतलेले दौरे रद्द करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, असे असतानाही पंचायत राज समिती ३ दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आली होती. २३ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पंचायत राज समितीचे जिल्ह्यात आगमन झाले. पहिल्या दिवशीचे कामकाज समितीने थोडक्यात आटोपून कोजागिरी पौर्णिमा समुद्रातMore
Published 25-Oct-2018 13:01 IST | Updated 13:06 IST
रायगड - अलिबाग तालुक्यातील हाशिवरे गावात अवैध पद्धतीने जुगार खेळणाऱ्या माजी सरपंचासह १३ जणांवर स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह १ लाख २५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Published 25-Oct-2018 08:24 IST
रायगड - अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटीला अपघात होऊन बोट बुडाली. बोट बुडाल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्यांची पीएनपी बोट घटनास्थळी पाठवली. बोटीमुळे २१ जणांचे प्राण वाचवता आले. बोट दुर्घटनेत एकाचा जीव गेला. यामधील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार पाटील यांनी इनाडू इंडियाशी बोलताना केली.
Published 24-Oct-2018 22:30 IST
रायगड- कामोठेत ओला, उबर कॅब चालकांनी बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. ओला, उबर कॅब चालकांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेने बेमुदत बंद पुकारला आहे. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
Published 24-Oct-2018 22:10 IST
रायगड - मराठा सेवा संघ- सभाजी ब्रिगेड संघटनेचे ९ वे राज्यस्तरीय अधिवेशन यावर्षी आलिबागमध्ये होणार आहे. हे अधिवेशन २७ व २८ ऑक्टोबर रोजी अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह येथे होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली.
Published 24-Oct-2018 22:02 IST
मुंबई - विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या निर्देशाला केराची टोपली दाखवत विधिमंडळाची पंचायत राज समिती थेट रायगड जिल्ह्यात जाऊन धडकली. हा दौरा अध्यक्ष आणि सभापतींच्या विशेष हक्काचे उल्लंघन असून या समितीवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published 24-Oct-2018 12:04 IST
रायगड - धुपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या देखभालीवर लक्ष दिले नाही, तर कोकणातही केरळसारखी परिस्थिती उद्भवणार आहे. कोकणातील आमदारांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे, असे मत शेकाप आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Published 24-Oct-2018 08:50 IST | Updated 08:54 IST

महिला पर्यटकाची हरवलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत