• किदम्बी श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
  • रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
  • कोल्हापूर: महसूल मंत्र्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी करा - आमदार क्षीरसागर
  • ठाणे : मनसैनिकांना चोख उत्तर देण्यासाठी डोंबिवलीतील भीमसैनिक सज्ज
  • सोलापूर : कर्जमाफीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात - सुभाष देशमुख
  • औरंगबाद : कर्जमाफीची मार्केटिंग करा - रावसाहेब दानवे
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - पाच वर्षांपूर्वी होनाड आदिवासी वाडीत दारू विक्री होत होती. परंतु, आदिवासी महिलांनी ती दारू विक्री बंद केली. मात्र, गावातच अवैध दारू विक्री करणारे असल्याने अनेक आदिवासी तेथे जाऊन दारू पिऊन घरातील महिलांना त्रास देतात. त्यामुळे २ ऑक्टोबरला संध्याकाळी या महिलांनी पोलीस पाटील राणी देशमुख यांच्या सहकार्याने सर्व दारू विक्रेत्यांना यापुढे दारू विक्री करू नये असा इशारा दिला.
Published 04-Oct-2017 15:02 IST
रायगड - जिल्ह्यातील रस्ते, पाणी पुरवठा आणि प्रदूषण यांसह सामान्य जनतेला भेडसावणार्‍या अन्य समस्या जाणून घेत राज्याचे बांधकाम आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्त्यांचा दर्जा घसरविणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका, अशी सक्त ताकीद त्यांनी जिल्ह्यातील बांधकाम अधिकाऱ्यांना दिली आहे.
Published 04-Oct-2017 07:54 IST
रायगड - शासकीय कार्यालये म्हणजे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे ठिकाण असते. परंतु असे असले तरी काही महाभागांनी अलिबाग पंचायत समितीचे आवार दारूड्यांसाठी ओपन बार बनवला आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन करणार्‍यांचा हा अड्डा बिनधोकपणे सुरु आहे.
Published 03-Oct-2017 19:33 IST
रायगड - अरबी समुद्रात ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी भूकंप होऊन ताशी १२० ते १८० किलोमीटर वेगाने सीशम वादळासह त्सुनामीचा फटका आशिया खंडातील ११ देशांसह आखाती देशांना बसण्याची शक्यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे.
Published 03-Oct-2017 16:41 IST
रायगड - जिल्ह्यातील माथेरान येथील पेब किल्ल्यावर ट्रेकींगसाठी आलेली आरुषी जैन (वय-२३) ही तरुणी दरीत पडली असून, तिला सुखरुप काढण्यात पोलिसांना आणि वनविभागाला यश आलेले आहे. आरुषी हिला नेरळ येथे रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Published 03-Oct-2017 14:45 IST
रायगड - रोहा शहरातील धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला पहिल्यांदाच जनतेचे रक्षक असणार्‍या पोलिसांनी आपली दंडेलशाही वापरून शहराची शांतता व परंपरा मोडीत काढली. या गोष्टीचा निषेध म्हणून रोहेकरांनी ४ ऑक्टोबरला शहरात बंद पाळून पोलीस प्रशासनाचा निषेध करून मुक मोर्चाचे आयोजन केले आहे.
Published 03-Oct-2017 11:29 IST
रायगड - सामान्य जनतेला माहिती मिळावी म्हणून माहिती अधिकार कायदा बनवण्यात आला. परंतु या कायद्यानुसार सामान्य जनतेला अपेक्षित माहिती मिळतच नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांना सहकार विभाग रायगड व अलिबाग नगरपालिकेकडून कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशी उत्तरे वारंवार येवू लागल्याने त्यांनी थेट माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Published 02-Oct-2017 22:46 IST
रायगड- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
Published 02-Oct-2017 19:04 IST
रायगड - या महिन्याच्या १६ तारखेला होणाऱ्या २४२ ग्रामपंचायतींच्या ७६० प्रभागातून सार्वत्रिक निवडणुकीसाठी सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत ५४५ तर १ हजार ९५६ सदस्य पदांसाठी २७५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
Published 01-Oct-2017 20:40 IST
रायगड - राज्यात २ ठिकाणी पोलिसांकडून पालखी सोहळ्यात मानवंदना दिली जाते. त्यापैकी रोहा शहराचे आराध्य दैवत धावीर महाराज हे एक आहे. या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे.
Published 01-Oct-2017 14:22 IST
रायगड - अलिबाग तालुक्यातील नवगाव समुद्रकिनारी कोळी बांधव पेर्‍याची मासेमारी करण्यास गेले होते. मासेमारीत त्यांना पाकट जातीची मच्छी मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. त्यामुळे विजयादशमी दिवशी नवगावकर कोळी बांधवांना लाखो रुपयांचे पाकटरुपी सोने मिळाले असे बोलले जात आहे.
Published 01-Oct-2017 13:00 IST | Updated 13:07 IST
रायगड - बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाविरोधात पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रोहा ते रामराजदरम्यान वाहतूक करणाऱ्या सहा मॅझिमो आणि मॅझिक गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Published 30-Sep-2017 12:52 IST
रायगड - अलिबाग तालुक्यातील खड्डेमय परिस्थितीने हैराण झालेले नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यासाठी निधी जमविण्यासाठी त्यांनी आता 'भीक मांगो' आंदोलन करुन शासनाविरोधात आपला निषेध व्यक्त केला आहे.
Published 30-Sep-2017 12:19 IST
रायगड - प्रस्तावित वडखळ-अलिबाग चौपद्रीकरण प्रकल्पासाठी जनसुनावणी पार पडली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवत गोंधळपाडा ते चेंढरे दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली.
Published 29-Sep-2017 19:11 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव