• किदम्बी श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
  • रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
  • कोल्हापूर: महसूल मंत्र्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी करा - आमदार क्षीरसागर
  • ठाणे : मनसैनिकांना चोख उत्तर देण्यासाठी डोंबिवलीतील भीमसैनिक सज्ज
  • सोलापूर : कर्जमाफीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात - सुभाष देशमुख
  • औरंगबाद : कर्जमाफीची मार्केटिंग करा - रावसाहेब दानवे
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - उरण चिरनेर येथील सर्पमित्र विवेक केणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन भल्या मोठ्या अजगरांना रानात सोडून जीवदान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हे साप मानवी वस्तीमध्ये आले असल्याचे या सर्पमित्रांचे म्हणणे आहे.
Published 08-Oct-2017 18:31 IST
रायगड - गेल्या काही दिवसांपासून अलिबाग, उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मासे आल्याने हे किनारे बातम्यांमध्ये झळकत होते. आता मात्र या किनाऱ्यांवर जेलिफिशने आक्रमण केले आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
Published 08-Oct-2017 17:35 IST
रायगड - श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणपती मंदिरातील दरोडा आणि दुहेरी खून प्रकरण महाराष्ट्रभर गाजले होते. या बहुचर्चित खटल्याचा निकाल शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी जाहीर होणार आहे.
Published 08-Oct-2017 12:34 IST
रायगड - जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील २४२ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया १६ ऑक्टोबरला होत आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यातील २४२ पैकी ६१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांची निवड बिनविरोध झाली असून ५४ ग्रामपंचायती पूर्णतः सरपंच व सदस्यासह बिनविरोध झाल्या आहेत.
Published 07-Oct-2017 21:05 IST
रायगड - महाड शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महाड विणेरे मार्गावरील कुर्ले गावात अंगावर वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वादळी पावसापासून बचावासाठी झाडाखाली या दोघांनी आश्रय घेतला होता. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
Published 07-Oct-2017 21:12 IST | Updated 22:29 IST
रायगड - निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शासनस्तरावर सर्व कामांची चौकशी करुन दोषी आढळलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे. पालकमंत्री मेहता दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेतला.
Published 07-Oct-2017 19:21 IST
रायगड - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीला आलेले भाताचे पीक भुईसपाट झाले असून हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास हिरावला गेला आहे.
Published 07-Oct-2017 17:03 IST
रायगड - घारापुरी बंदरालगत असणाऱ्या जवाहरद्वीप म्हणजेच बुचर आयलँडवरील तेलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यांना मोठी आग लागली आहे. वीज पडून ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. या आगीमध्ये अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published 06-Oct-2017 22:19 IST | Updated 22:26 IST
रायगड - जिल्ह्यात वाहतूक पोलीस शाखेमार्फत जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या नऊ महिन्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या १६९१ तळीराम चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मद्यपी चालकांकडून २५ लाख ३२ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
Published 06-Oct-2017 11:56 IST
रायगड- ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ५ तर सदस्यपदांसाठीच्या अर्जांपैकी ३६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. येत्या १६ ऑक्टोबरला जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींकरता निवडणूक होत आहे.
Published 05-Oct-2017 22:39 IST
रायगड - अलिबागच्या नायब तहसीलदारास ४ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. तहसीलदाराने ऐपतीचा दाखल‍ा देण्यासाठी ही लाच मागितली होती. सुभाष रामचंद्र म‍ाने (५६) असे त्या लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.
Published 05-Oct-2017 20:23 IST
रायगड - अलिबाग-रेवदंडा या मुख्य रस्त्याचे काम गुरुवारी (५ ऑक्टोबर) सुरू झाल्यास रस्त्यांच्या प्रश्‍नासाठी करण्यात येणारे रास्तारोको जन आंदोलन थांबविण्यात येईल. मात्र, बांधकाम अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास शुक्रवारपासून आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जिल्हा परीषदेतील विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी बांधकाम अधिकारी कांबळे यांना दिला आहे.
Published 05-Oct-2017 11:23 IST
रायगड- धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात रोहावासीयांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. या मोर्चाला पाठिंबा दर्शवत रोह्यावासीयांनी शहरातील व्यवहार १०० टक्के बंद ठेवले होते.
Published 04-Oct-2017 22:35 IST
रायगड - माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. येथे येणारे पर्यटक आनंद लुटण्यासाठी येतात. पण गेल्या काही दिवसात माथेरानमधील चित्र बदलत आहे. येथे असणाऱ्या हनीमुन पॉईंटजवळ श्याम रुपाणी (७०) या वृद्धाने आत्महत्या केली. गेल्या ८ दिवसातील याच पॉईंट वर आत्महत्या केलेली ही दुसरी घटना आहे. यामुळे येथील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Published 04-Oct-2017 17:07 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव