• लंडन : ब्रिटनच्या संसदेसमोर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी 'आयसिस'ने स्वीकारली
  • नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब
  • सातारा : उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
  • मुंबई : संपावर गेलेले १५२ डॉक्टर कामावर रुजू
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - मुंबई येथील व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याच्याकडील ४० लाख रुपये लुटले होते. याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य महिला आरोपीसह ९ जणांना अलिबाग न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published 13-Jan-2017 21:00 IST
रायगड - खालापूर तालुक्यातील चांगवडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यमुना वासुदेव खडके (११) इयत्ता ६ वी असे त्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
Published 13-Jan-2017 20:54 IST | Updated 22:34 IST
रायगड - दिल्ली - मुंबई कॉरीडोरचे भूत पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित दिल्ली - मुंबई औद्योगिक प्रकल्पासाठी सरकारने वाटाघाटीने सुरू केलेल्या भूसंपादनास शेतकऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही. त्यामुळे उर्वरीत जागा संपादनासाठी शासनाकडून सक्तीचे भूसंपादन करण्याची परवानगी मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Published 13-Jan-2017 17:31 IST
ठाणे - मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळ विचित्र अपघात झाला आहे, सिमरन मोटर येथे एमएच - ४६ एयू - ९७८७ या नंबरची अल्टो कार २० ते २५ फुट खोल विहीरित पडण्याची घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजता ही घटना घडली.
Published 12-Jan-2017 14:03 IST
रायगड - मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. रायगड जिल्हापरिषदेच्या ५९ व १५ पंचायत समित्यांच्या १५९ जगांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
Published 12-Jan-2017 12:57 IST | Updated 16:09 IST
रायगड - माथेरानचे आकर्षण असलेली आणि माथेरानकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'मिनी ट्रेन' ची सेवा पूर्ववत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि उपाय योजनांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्प निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
Published 12-Jan-2017 11:26 IST | Updated 11:42 IST
रायगड - जिल्ह्यात सर्व तालुक्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ३५ हजार सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामधील दुरुस्त्यांचे काम सध्या सुरू आहे.
Published 10-Jan-2017 13:34 IST
रायगड - मुंबई येथील व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याचाकडील ४० लाख रुपये लुटणाऱ्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Published 06-Jan-2017 18:59 IST
राडगड - केंद्र सरकारच्या निश्‍चलीकरणाविरुद्ध रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या रायगड जिल्हा काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
Published 06-Jan-2017 17:39 IST
रायगड - राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यात ४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने चक्रीवादळ निवारा केंद्र, खारबंदीस्तीची कामे आणि भूमिगत विद्युतवाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत अलिबाग शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत राहावा यासाठी अलिबाग शहरातील विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत येणार आहे. या कामालाMore
Published 05-Jan-2017 13:48 IST
रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला नवीन दरवाजा बसवण्यात आला आहे. १६ फुट उंचीचा हा भव्य दरवाजा अस्सल सागवानी लाकडातून बनवण्यात आला आहे. यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी पुरातत्व विभागाने खर्च केला आहे.
Published 05-Jan-2017 13:16 IST
रायगड - समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता व्हावी आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून किनारपट्टीवरील गावांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या चार जिल्ह्यांमध्ये 'निर्मल सागर तट' अभियान राबविण्यात येणार आहे.
Published 02-Jan-2017 12:02 IST
रायगड - डिसेंबर महिना सुरू झाला की वेध लागतात ते सरत्या वर्षाला निरोप देण्याचे आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे. नववर्षाच्या स्वागतासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडाला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.
Published 29-Dec-2016 20:05 IST | Updated 20:31 IST
रायगड - नववर्ष स्वागताला दोन दिवस उरले असताना रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने २६ ते २८ डिसेंबर या दोन दिवसात अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह एकूण ७ लाख ७९ हजार ४६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून २ आरोपींना अटक केली आहे.
Published 28-Dec-2016 22:32 IST

साखरपुड्याहून परतणाऱ्या जीपला अपघात; दोघांचा मृत्य...
video playझेडपी अध्यक्षपदी तटकरे, उपाध्यक्षपदी पाटील
झेडपी अध्यक्षपदी तटकरे, उपाध्यक्षपदी पाटील
video playरायगड जिल्‍ह्यात क्षयरुग्‍णांचे प्रमाण घटले
रायगड जिल्‍ह्यात क्षयरुग्‍णांचे प्रमाण घटले

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

हे व्यायामप्रकार करुन उन्हाळ्यातही राहा फिट
video playही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी
ही फळे खाल्ली तर अशक्तपण न येता वजन होईल कमी

video playरजनीकांतच्या
रजनीकांतच्या '2.0' च्या सेटवर पत्रकाराशी गैरवर्तन