• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - तळोजा एमआयडीसी येथे सुपरफ्रेश कोल्ड स्टोरेजमधील तब्बल १०० टन गोमांस पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले. हे गोमांस पाठवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे.
Published 09-Jan-2018 10:29 IST
रायगड - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत पुरवल्‍या जाणाऱ्या कर्जापैकी रायगड जिल्‍ह्यात तब्‍बल ३७ लाख ९४ हजार रुपये थकले आहेत. या थकवलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी महामंडळातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. एक रकमी मुद्दल आणि व्याज भरल्यास व्याजावर २ टक्के सवलत दिली जाणार आहे.
Published 09-Jan-2018 09:58 IST
रायगड - जासई गावाजवळील अश्विनी लॉजिस्टिक सोल्यूशन या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा जासई भागातील अनधिकृत गॅरेज आणि गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Published 09-Jan-2018 07:54 IST | Updated 07:55 IST
रायगड - भाजप-शिवसेना युती ही फेकू व खोटारडे सरकार आहे. या सरकारच्या काळात जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला असून हे सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे. नोटाबंदी झाल्यामुळे विकासदर घटला आहे. लोकांना भूलभुलैया करण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
Published 08-Jan-2018 21:22 IST
रायगड - माणगाव तालुक्यातील बहुउद्देशीय कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम सध्या रखडलेले आहे. प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्याने हे काम थांबविण्यात आल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. केवळ कोकणातील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे व कोकणाविषयीच्या आकसामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याचे समोर आले आहे.
Published 08-Jan-2018 11:06 IST
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे गॅस ट्रक व कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात नागोठणे येथील चार तरुण गंभीर जखमी झाले असून एक जण जागीच ठार झाला. अनुज भुरके असे त्या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात पहाटे सव्वाचार वाजता घडला.
Published 08-Jan-2018 10:05 IST
रायगड - मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा भीषण अपघात होऊन जावयासोबत मोटारसायकलवरून जाणाऱ्या वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला प्रथमोपचारानंतर तातडीने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Published 07-Jan-2018 22:51 IST
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे ४ वाजता ट्रेलर व कारचा अपघात झाला. या अपघातात कार चालक जागीच ठार झाला आहे. योगेश दिगंबर खोरजुवेकर (वय २७ रा. मालवण) असे या ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
Published 07-Jan-2018 21:44 IST
रायगड - उरणमधील जंगलामध्ये वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हे वणवे समाजकंटकच लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अवैधपणे प्राण्यांची शिकार करणारे, वनविभागातून, डोंगरातून माती चोरणारे माती माफिया, जंगलातील झाडे तोडणाऱ्या व्यक्ती, अशा प्रकारचे वणवे लावत आहेत. यामुळे वन्यजीवांबरोबरच उरणच्या डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Published 07-Jan-2018 21:50 IST
रायगड - कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर प्रथमच वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातून आलेल्या वाळूशिल्प कलाकारांनी अनेक सुंदर वाळूशिल्प बनवून लोकांची मने जिंकली. ही वाळूशिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Published 07-Jan-2018 19:35 IST
रायगड - पाणी बचतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हापरिषदेने जिल्ह्यात २८०४ वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यात एकूण १२६.१८ घनमीटर जलसाठा आहे. लोकसहभागातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे शासनाचे १५ कोटी ४२ लाख ५ हजार रुपयांची बचत झाली आहे.
Published 07-Jan-2018 12:17 IST
रायगड - जुन्या भांडणाचा राग मनात धरुन १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने मित्राच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून निर्घृण खून केला. ही घटना घडली उरण तालुक्यातील जासई येथे घडली आहे. गुलाबचंद महतो (२२) असे त्या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कर्जत येथील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
Published 07-Jan-2018 08:04 IST
रायगड - सरकारी कार्यालय, खासगी कार्यालय इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण ठेण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येते. मात्र जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाल्याचे दिसून आले आहे.
Published 06-Jan-2018 14:45 IST
रायगड - जेएनपीटी ते दिल्ली असा नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण केला जाणार असून या कॉरिडॉरसाठी उरण आणि पनवेल तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या रेल्वे कॉरिडॉरमुळे जेएनपीटीतून आयात, निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक सोयीस्कर होणार आहे. फक्त माल वाहतुकीसाठी हा कॉरिडॉर बांधला जाणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातून हा कॉरिडॉर जाणार आहे.
Published 06-Jan-2018 07:44 IST

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

एनर्जी ड्रिंक्स आहेत युवकांच्या आरोग्यासाठी घातक
video playव्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
व्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
video playहे उपाय मिळवून देतील तुम्हाला
हे उपाय मिळवून देतील तुम्हाला 'शांत झोप'

video play
'कामसूत्र'वाली इंदिरा 'ती सध्या काय करते' ?