• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका व पाच नगरपंचायती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रायगड परिषदेचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्नात वाढ होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जागा, इमारती बांधा वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर देण्यात येणार आहेत.
Published 05-Apr-2017 22:42 IST
रायगड - हवामानातील बदलांच्या अचूक नोंदीचा वापर कृषीविषयक घटकांसाठी करता यावा, म्हणून राज्यभरात मंडल अधिकारी स्तरावर राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणर आहेत. या योजनेतून रायगड जिल्ह्यात ६० ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. पाच चौरस मीटर परिसरात या हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे.
Published 05-Apr-2017 22:37 IST
अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमा मुंडे तर समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी शेकापचे नारायण डामसे बिनविरोध निवडून आले.
Published 04-Apr-2017 15:02 IST
रायगड - मुरूड तालुक्यातील एकदारा, अलिबाग तालुक्यातील थेरोंडा व उरण तालुक्यातील नवापाडा येथे नवीन मच्छीमार जेट्टी बांधण्यास मंजूरी मिळली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सहकार्यातून जेट्टी बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती नाबार्डचे रायगड जिल्हा विकास व्यवस्थापक सुधाकर रघतवान यांनी दिली.
Published 03-Apr-2017 21:08 IST
रायगड- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ८११ मद्यविक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत.
Published 02-Apr-2017 22:28 IST
रायगड - महाड - पुणे मार्गावर वरंध घाटात अचानक दरड कोसळून रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्‍कळीत झाली आहे.
Published 02-Apr-2017 19:46 IST | Updated 19:50 IST
रायगड - मुंबईतील जिना हाऊस महाराष्ट्र सरकारने पाडावे, अन्यथा बाबरी मशिदीप्रमाणे आम्ही ते उद्ध्वस्त करू, असा इशारा विश्वहिंदू परिषदेचे मुख्य प्रवक्ते प्रा. सुरेंद्रकुमार जैन यांनी दिला आहे.
Published 02-Apr-2017 16:37 IST
रायगड- आदिवासी कातकरी समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहु नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी पहिलीच्या मराठी पुस्तकाचा कातकरी भाषेत अनुवाद केला आहे. गजानन जाधव असे त्या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे कातकरी आदिवासी समाजाच्या मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
Published 31-Mar-2017 22:20 IST
रायगड- जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी प्राप्त झालेला ३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्चच झाला नाही. त्यामुळे हा निधी समर्पित करण्याची वेळ रायगडच्या कृषी विभागावर आली आहे. हा अखर्चित निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांसाठी वापरण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सरकारकडे सादर केला आहे.
Published 31-Mar-2017 21:00 IST
रायगड- भिरा येथे २७ एप्रिल २००५ रोजी ४९ अंश सेल्‍सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे ४६.५ अंश सेल्‍सिअस तापमान हे भीरा येथे नोंदविले गेलेले सर्वोच्च तापमान नाही, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्‍त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी दिली.
Published 31-Mar-2017 17:58 IST
रायगड - पनवेल महापालिका स्थापन झाल्यामुळे कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या ग्रामपंचायती रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून महापालिकेत हस्तांतरीत झाल्या. त्यामुळे मूळ अर्थसंकल्प ७० कोटींचा असताना झेडपी मुद्रांक शुल्काचे उत्पन्न ताब्यातून गेल्याने यंदाचा अर्थसंकल्प ४५ कोटी ३१ लाखाचा झाला आहे.
Published 30-Mar-2017 15:44 IST
रायगड - राज्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
Published 30-Mar-2017 10:01 IST
रायगड - राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. रायगड जिल्‍ह्यातीलही अनेक भागात तापमानाने चाळीशीचा आकडा पार केला आहे. भिरा येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली.
Published 28-Mar-2017 11:02 IST | Updated 11:30 IST
ठाणे - नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेची प्रथम सार्वत्रिक निवडणूक २० मेच्या सुमारास होण्याची शक्यता पालिकेचे नवनिर्वाचीत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी याला विरोध केला आहे.
Published 26-Mar-2017 21:47 IST

ईडीचा दणका ; विजय मल्ल्याचा मांडव्यातील बंगला सील
video playगोदामे उपलब्ध होत नसल्याने भात खरेदीस अडचण
गोदामे उपलब्ध होत नसल्याने भात खरेदीस अडचण

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका