शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील
विवेक पाटील यांनी पनवेलमधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे आर. आर. पाटील यांचे लक्ष वेधले होते. पनवेल तालुक्यातील या डान्स बारमध्ये पुण्याहून येणाऱ्या ‘रसिकांची’ संख्या जास्त होती. त्यामुळे हे रसिक पहाटे घरी परतत असताना अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर पनवेल शहरातील तरुणाई डान्स बारमध्ये वाया जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पाटील यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि ऑगस्ट २००५ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्स बारवर बंदी घातली. त्यावेळी राज्यात एकूण १४०० डान्स बार होते. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील डान्स बारची संख्या ९०० पर्यंत होती.
आता पुन्हा डान्स बार सुरु झाले तर परिस्थिती जैसे थे अशी होईल, अशी भीती पनवेलमधील ग्रमास्थांनी व्यक्त केली आहे. हा निर्णय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार विवेक पाटील यांनी दिली. या निर्णयाविरोधात आम्ही वैधानिक लढा देणारच आहोत, पण डान्स बारच्या समोर भजन आणि किर्तनाचा कार्यक्रम ठेवू, असा इशारा यावेळी विवेक पाटील यांनी दिला.