• मुंबई - खार स्टेशनवर जलद लोकलच्या पेंटाग्राफला आग, जीवितहानी नाही
  • सातारा- महाबळेश्वरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू
  • पुणे : माओवाद्यांशी संबंधित ५ जणांवर ५१६० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - माणगाव नगरपंचायतीतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या पतीसह इतर ३ नगरसेविकांच्या पतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कटशहाचे राजकारण पहावयास मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळाMore
Published 12-Nov-2018 20:44 IST
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर कशेळी घाटातील एका अवघड वळणावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. ही घटना येलंगेवाडी गावाच्या हद्दीत घडली.
Published 12-Nov-2018 17:36 IST
रायगड - अलिबाग तालुक्यातील शिरवलीच्या नित्यनाथ पाटील यांच्या बागेतील हापूस आंबा मुंबईच्या बाजारात दाखल झाला आहे. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशीच हापूस आंबा बाजारात दाखल झाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published 12-Nov-2018 13:29 IST
रायगड - दिवाळी व सलग आलेल्या सुट्टीमुळे पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली. लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. चाकरमानी आणि पर्यटक परतीच्या मार्गावर निघाल्याने रविवारी सायंकाळपासून माणगाव, वडखळ ते पेण येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Published 12-Nov-2018 09:06 IST | Updated 09:29 IST
पनवेल - 'डॉ. काशिनाथ घाणेकर' हा मराठी चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शीत झाला आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाही अनेक चित्रपटगृहांमध्ये याचा दिवसभरात फक्त एकच शो दाखवण्यात येत होता. मात्र, या चित्रपटाला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळखटॅक करू, असा इशारा मनसेने दिल्यानंतर कल्याण, मुंबई पाठोपाठ पनवेलमधील मल्टिप्लेक्स चालक नरमले आहेत. अनेक मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे शो वाढवण्यात आलेMore
Published 12-Nov-2018 04:03 IST
रायगड - सायन-पनवेल महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दिवाळीच्या सुट्टयांवर गेलेले प्रवासी आज परतत असल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. खारघर पासून ते कळंबोलीपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.
Published 11-Nov-2018 23:36 IST | Updated 23:42 IST
रायगड - दिवाळीच्या सुट्टींमुळे अलिबाग परिसर पर्यटकांनी बहरुन गेला आहे. मुंबईवरुन अलिबागला पर्यटनास आलेल्या एका महिलेची रिक्षात राहिलेली बॅग प्रामाणिकपणे रिक्षाचालक अमोल तांडेल याने परत दिली .
Published 11-Nov-2018 17:26 IST
रायगड - रेल्वेने पनवेलकरांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. आजपासून 'पेण-पनवेल' ही मेमू रेल्वे सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सेवेचे उद्धाटन झाले. या सेवेमुळे पनवेल आणि पेणकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published 11-Nov-2018 15:11 IST
रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील खोपोली मिल ठाकूरवाडी जवळ स्कूल बस पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात एकूण १८ प्रवाशी होते. त्यापैकी बसमधील एकाच कुटुंबातील ६ जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी व पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलविले आहे.
Published 10-Nov-2018 21:17 IST
रायगड - दिवाळीच्या सुट्ट्टया घालविण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात येत आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढून लांबच-लांब रांगा लागल्याने पेण वडखळ येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Published 10-Nov-2018 17:27 IST
रायगड - खोपोली शहरातील अरिहंत टॉवरमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमला सकाळी अचानक आग लागली. ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजले नाही. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात यश मिळवले. या आगीत बँकेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
Published 10-Nov-2018 14:52 IST
रायगड - अलिबाग तालुक्यातील बामणगाव आदिवासी, ठाकूर वाडीवर गेल्या ५० वर्षांपासून रस्ता नाही. येथील आदिवासी, ठाकूर लोक आजही खडतर प्रवास करत आहेत. ही समस्या सोडविण्यात स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन मात्र कुचकामी ठरले आहे.
Published 10-Nov-2018 14:33 IST
रायगड - भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे अतूट नाते असलेला भाऊबीज सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपला पाठीराखा असलेल्या भावाच्या आगमनासाठी व त्याला ओवाळण्यासाठी बहिणीच्या घरात लगबग सुरू होती. तर भाऊरायाही बहिणीकडे जाण्यासाठी आतुर झालेला होता.
Published 09-Nov-2018 23:52 IST
रायगड - लक्ष्मण दिवेकर यांचा २ लाख ३५ हजार रुपयांचा रोख रकमेचा धनादेश प्रवासादरम्यान रस्त्यात पडला. हा धनादेश शासकीय कर्मचारी संजय पवार यांनी दिवेकर यांना परत दिला. पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Published 09-Nov-2018 23:41 IST

महिला पर्यटकाची हरवलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत