• पुणे- शार्दूल जाधव यांना 'अजित युवा पुरस्कार' जाहीर
  • पुणे- निगडी पोलिसांकडून पहाटे २ गुन्हेगारांना अटक, २ पिस्तूल जप्त
  • नागपूर- युग चांडक प्रकरण : अल्पवयीन आरोपी दोषी,आज निकाल
  • जम्मू-पठाणकोट रस्त्यावर अपघात, १ ठार तर २२ जण जखमी
Redstrib
रायगड
Blackline
रायगड - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश कार्यशाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. तयार मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे.
Published 19-Jul-2017 17:21 IST
रायगड - पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हिरवळीने नटलेले असते. त्याचसोबत डोंगर कड्यांवरून फेसाळणारा धबधबाही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. पुण्याजवळील झेनिथ धबधबा हा देखील सध्या जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
Published 16-Jul-2017 20:58 IST
रायगड - जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचे दिलासादायक पुनरागमन झालेले आहे. गेल्या २४ तासात एकूण १५६५.३३ मि. मि. इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून, शेतकऱ्यांमध्ये भात लावणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात तब्बल ५७ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. पावसाच्या पुनरागमनाने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांना वेग आला आहे.
Published 15-Jul-2017 16:30 IST
रायगड - नव्यानेच महानगर पालिकेमध्ये रूपांतरित झालेल्या पनवेल पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू होते. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे काम सुरू असताना अचानक बांधकाम सुरू असलेला स्लॅब कोसळला.
Published 15-Jul-2017 15:50 IST
रायगड - दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून झाल्याचा संशय आहे. मृतदेहापासून काही अंतरावर जादूटोणा केल्याचे साहित्य सापडल्याने हा नरबळी असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र याप्रकरणी सावध भूमिका घेत तपास सुरू केला आहे.
Published 14-Jul-2017 10:18 IST
रायगड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७१ प्रकल्पांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. शासनाच्या जल स्वराज्य टप्पा क्र. २ या योजनेसाठी कोकण विभागातून रायगड जिल्ह्यातील कुंभिवली ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कुंभिवली ग्रामपंचायतीच्या जल स्वराज्य टप्पा क्र. २ योजनेचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Published 12-Jul-2017 11:54 IST | Updated 12:06 IST
नवी मुंबई - पनवेल महानगर पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमल तर उपमहापौर पदी भाजपच्या चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड आज झाली.
Published 10-Jul-2017 13:38 IST
पुणे/रायगड - माणगाव येथील देवकुंड धबधब्याच्या पाण्यात पुण्यातील दोन तरुण रविवारी बुडाले. त्यांची शोधाशोध काल सुरू होती. मात्र संध्याकाळनंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते. आज (सोमवार दि.१०) सकाळपासून ते शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. बुडालेल्यांमध्ये भोसरी येथील २३ वर्षीय अखिल चौधरी आणि पुण्यातील २५ वर्षीय विद्यार्थी नितीन पाठक यांचा समावेश आहे.
Published 10-Jul-2017 14:02 IST | Updated 16:06 IST
रायगड - गेल्या ४ दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे कोकणातले धबधबे आता ओसंडून वाहत असतानाचे विहंगम दृश्य दिसू लागले आहे. यामुळे खोपोलीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडोशी धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published 05-Jul-2017 16:00 IST
रायगड - अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये अनामत रक्कम खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ घेत आहे. संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ही रक्कम घेत असल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र पालकांनी याला तीव्र विरोध केला आहे.
Published 05-Jul-2017 15:30 IST
रायगड - रोहा तालुक्यातील उदडवणेमार्गे खांबकडे जाण्याऱ्या पर्यायी मार्गावरील पालदाड पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाकडून तात्परूती डागडूजी करण्यात आली आहे. मात्र भविष्यात या पुलास मोठा अपघात झाल्यास परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
Published 03-Jul-2017 18:10 IST
रायगड - बाईक रायडरची पर्वणी म्हणजे पावसाळ्यातील स्कूटर रॅली. रोजच्या जीवनात डांबरी किवा सिमेंट काँक्रीटच्या रोडवरून धूम स्टाईलने बाईक चालवणारे खूप दिसतात. त्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला वेळोवेळी सामोरे जावे लागते. आपल्या आवडीला प्रोस्थाहन देण्यासाठी ही बाईक रायडर मंडळी पनवेल येथे दरवर्षी होणाऱ्या स्कूटर रॅलीची आतुरतेने वाट पाहतात.
Published 03-Jul-2017 16:24 IST
रायगड - महाड तालुक्यातील दरडप्रवण दासगावमध्ये गुरुवारी संध्याकाळी डोंगरालगतच्या वस्तीमधील दोन घरावर दरड कोसळली. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतत निर्माण झाली. २००५ सालीही २५ आणि २६ जुलैला या लोकवस्तीजवळ असलेल्या काही घरांवर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या यात ४२ हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता.
Published 03-Jul-2017 14:43 IST | Updated 14:47 IST
रायगड - एरव्ही कोणाच्या नजरेत न पडणारे जंगलातील मोर आता जोरदार पावसामुळे थेट अन्नाच्या शोधात गावात धाव घेत आहेत. असाच भुकने व्याकूळ झालेला मोर कर्जत तालुक्यातील तमनाथ येथील नारायण भोईर यांच्या अंगणात पोहोचला. या मोराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
Published 03-Jul-2017 12:31 IST

video playगणेश मूर्तींवर फिरतोय अखेरचा हात. . .

सनी लिओनी