• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
पालघर
Blackline
पालघर - मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सोशल मीडियावर महिला अधिकारीच सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. जसे द्रौपदीला कृष्णाने वाचविले तसे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या आंदोलनावेळी मला पोलिसांनी वाचविल्याचेही त्यांनी म्हटले.
Published 29-Apr-2017 11:25 IST | Updated 14:10 IST
पालघर - बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी डॉ. अनिल यादवला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या गुन्ह्यात माजी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली असून यादवला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे
Published 29-Apr-2017 09:33 IST | Updated 09:44 IST
पालघर - येत्या १ मेला महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी भारती आणि मराठी भारती तर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये 'संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सफाळे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
Published 28-Apr-2017 18:55 IST
पालघर - जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लाईव्ह लिलावाच्या माध्यमातून बीपीएल लाभार्थ्यांना ३ हजार ६९३ क्विंटल एस-३० दर्जाची साखर मिळणार आहे. मे महिन्यात ही साखर प्राप्त होणार आहे.
Published 28-Apr-2017 10:47 IST
पालघर - जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धा विजेते ( अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी), संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार (पाणी व स्वच्छता विभाग) व आनंदीबाई जोशी पुरस्कार (आरोग्य विभाग) निवृत्त कर्मचारी सत्कार आदि पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Published 27-Apr-2017 21:01 IST
पालघर - जिल्ह्यातील कुपोषण, पोषण आहार आणि अंगणवाडी सेविका यांच्या समस्यांबाबत २४ एप्रिल रोजी झालेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करून प्रशासनाने आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
Published 27-Apr-2017 19:43 IST
पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडाला. मात्र बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई न कराता पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. यामुळे मोठा अपघात झाल्यावरच पोलीस कारवाई करणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Published 27-Apr-2017 14:26 IST
पालघर - वसई विरारमध्ये माहिती अधिकार आणि बंदुकीच्या धाकाने बिल्डरांकडून डॉक्टर अनिल यादव याने खंडणी उकळली होती. त्याच्या मुसक्या आवळणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची अचानक झालेली बदली रद्द करण्यात आली. यामुळे याप्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येणार असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
Published 27-Apr-2017 12:16 IST
पालघर - तारापूर येथील पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एमआयडीसीमधील सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदची करवाई केली. तसेच दोन उद्योग तात्पुरते बंद तर एका उद्योगाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. डिसेंबर २०१६ पासून ही तिसरी करवाई असून, यापूर्वी एकूण ४९ उद्योगांवर कारवाई करण्यात आली होती.
Published 26-Apr-2017 22:37 IST
पालघर - तालुक्यातील सफाळे तसेच मोखाडा तालुक्यातील ६१ गावे अणि पाडे तसेच इतर ही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.
Published 26-Apr-2017 21:24 IST
पालघर - वसई, विरार शहर महानगर पालिकेच्या फ प्रभागातील वार्ड ४२ मध्ये पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. परिसरातील बोअरिंग आटल्या आहेत. ज्यांच्या बोअरिंग चालू आहेत त्यांनी पाणी विक्रीचा धंदा सुरु केला आहे.
Published 26-Apr-2017 19:15 IST
पालघर - नोटाबंदीच्या काळात कमिशनवर जुन्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू होता. या काळात मालकाने आपला वापर करून आपल्यावर फसवणुकीचा आरोप केला. तसेच वारंवार धमक्या दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुणाने आत्महत्या केली. पंकज बाणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
Published 26-Apr-2017 17:07 IST | Updated 17:23 IST
पालघर - पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना वसईमध्ये घडली.
Published 26-Apr-2017 16:17 IST
पालघर - वसई पूर्वेकडील वसंत नगरी येथे शेठ विद्यामंदिर विद्यालयाच्या रस्त्यापुढील गटारावरील झाकण तुटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
Published 25-Apr-2017 11:30 IST | Updated 13:05 IST

आयपीएल सामन्यावर सट्टा, एकाला अटक
video playकोरेपल्ली जंगलात बिबट्याची शिकार, कातडीसह एकास अटक
कोरेपल्ली जंगलात बिबट्याची शिकार, कातडीसह एकास अटक

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे