• ठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या
  • ठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश
  • नाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू
  • नाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट
  • नाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू
  • मुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली
  • मुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा
Redstrib
मुंबई
Blackline
मुंबई - भारतीय जनता पक्षाविरोधात सर्वच राजकीय पक्ष प्रचार सभेतून विरोध करत आहेत, मात्र आता विरोधी पक्षाकडून रस्त्यावरही विरोध करू लागले आहेत. ईशान्य मुंबई भाजपतर्फे घाटकोपर येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता. या रोजगार मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करत परिसर दणाणून सोडला.
Published 17-Feb-2019 23:16 IST
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये 'प्रेरणा प्रकल्पा'च्या माध्यमातून आतापर्यंत ३ वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत सुमारे २६ हजार फोन आले आहेत.
Published 17-Feb-2019 21:04 IST
मुंबई - विद्यार्थ्यांनी शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी रोज एक तास मैदानावर खेळले पाहिजे. मुले मैदानापेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवितात. त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. प्रशिक्षकांनी चांगले खेळाडू घडविण्यासाठी झोकून देण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ सुरु करणार असल्याची घोषणा राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी केली आहे.More
Published 17-Feb-2019 19:36 IST
मुंबई - मैत्रीत पैशांसाठी दगाबाजी करीत आपल्याच मित्राचे ९ लाख रुपये चोरून पळ काढणाऱ्या आरोपीला मुंबईच्या सायन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ९ लाखांपैकी ६ लाख रुपये हस्तगत केले आहेत.
Published 17-Feb-2019 19:23 IST
मुंबई - सत्तेत बसून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणारी शिवसेना आता भाजपसोबत जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. परंतु, सत्तेवर पाणी सोडून राजीनामे खुशाल खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेला आता जनतेसमोर काय सांगायचे हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
Published 17-Feb-2019 17:01 IST
मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चित्रपट शाखाने भारतीय संगीत कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम बंद करण्यास सांगितले आहे.
Published 17-Feb-2019 15:02 IST | Updated 15:12 IST
मुंबई - जगभरात स्मार्ट फोन मोबाईलमध्ये क्रांती झाली. भारतात तर मोबाईलने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले. लहान मुले तर याच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेली. घरातील लहान मुलांच्या हाती मोबाईल फोन आल्यानंतर त्याचा परिणाम मुलांच्या जीवावर बेतू लागला. याचे उदाहरण मुंबईत पाहायला मिळाले. आईने मोबाईलवर खेळण्यास मज्जाव केल्याने, अक्षया मालवणकर या १३ वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीMore
Published 17-Feb-2019 13:42 IST | Updated 19:26 IST
मुंबई - आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी या तिन्ही मार्गावर सकाळी ११ वाजून १० मि. ते दुपारी ३ वाजून ४० मिनीटापर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published 17-Feb-2019 10:26 IST
मुंबई - एकीकडे पुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दु:खात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावत उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या ४४ जवानांची घरे उद्ध्वस्त झाली असताना, पंतप्रधान मोदी प्रचारसभेत व्यस्त असल्याचे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींसहMore
Published 17-Feb-2019 10:01 IST
मुंबई- पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 45 जण शहिद झाले. या घटनेने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बदला घेण्याची भावना व्यक्त होत आहे. या भ्याड कृत्याचा निषेध म्हणून मुंबईतील सीसीआय अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने इम्रान खानचे पोस्टर झाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Published 17-Feb-2019 01:39 IST | Updated 03:08 IST
मुंबई - शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना छत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला. देशपांडे हे वादग्रस्त असून त्यामुळे राज्यात एक वेगळा संदेश जाणार असल्याने उद्याच्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी क्रिडा पत्रकारीतेचे जनक वि.वि. करमरकर यांनी आज केली.
Published 17-Feb-2019 00:28 IST
मुंबई - मागील एनडीएच्या सरकारने ज्या जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला कंदाहारपर्यंत नेऊन सोडले त्याच मसूद अजहरने आमच्या सैनिकांवर हल्ला केला. आमच्या ४४ जवानांचे बळी घेतले. हा हल्ला आमच्या देशाच्या अस्मितेवर आहे. त्यामुळे या हल्ल्याची केवळ दहशतवादी अंगानेच नाही तर विविध अंगाने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी आज मुंबईत केली.
Published 16-Feb-2019 23:26 IST
मुंबई - कलादालनांवर लक्ष केंद्रित करणारे,अनेक चित्र-शिल्प प्रदर्शन विविध देशात विविध ठिकाणी आपण पाहतो. काही मोठी मोठी कलाकृतीची प्रदर्शन भरतात त्याचा गाजावाजा न होता त्याबद्दल कधी आपल्याला माहीतच पडत नाहीत. असाच एक विविध देशातील निवडक कलाकारांचं कलाकृती प्रदर्शन मुंबई जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरलं आहे.
Published 16-Feb-2019 22:53 IST
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या काळातच मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र २०१९ च्या (उन्हाळी सत्राच्या) महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षाच्या व विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठी आज शनिवार विद्यापीठाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या काळातच या परीक्षा येत असल्याने राज्यातील निवडणुका आणि त्यांचा कार्यक्रम लक्षात घेऊन त्यात बदलMore
Published 16-Feb-2019 22:32 IST
Close

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक