• यवतमाळ - टी-१ वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न
  • नाशिक : गंजमाळ झोपडपट्टीला आग, महिला जळून खाक
  • मुंबई : कदमवाडीत छटपूजेदरम्यान गॅसगळतीमुळे आग
Redstrib
मुंबई
Blackline
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आदिवासी कसत असलेल्या जमिनीचे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन ६ महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र त्याची अंमबजावणी आत्तापर्यंत झाली नसल्याने याविरोधात आदिवासी संघटनेकडून २१ नोव्हेंबरला पुन्हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, नांदेड भागातील आदिवासी सहभागी होणार असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाMore
Published 15-Nov-2018 00:28 IST
मुंबई - आज बालदिनाच्या निमित्ताने मुंबईतील वेगवेगळ्या विभागातील १०० मुलांनी दादर रेल्वे स्थानकाजवळ मानवी साखळी तयार केली. युवा संस्थेच्या माध्यमातून आज बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी युवा संस्था, चाईल्ड लाईन, रेल्वे पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे, रेल्वे अधिकारी सुहास सावंत, स्टेशन संचालक विश्वेशर सिंग, मनसेचे संदीप देशपांडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Published 14-Nov-2018 23:54 IST
मुंबई - 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी संपली तरी अद्याप बोनस देण्यात आला नसल्याने आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीतून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने सभात्याग केला.
Published 14-Nov-2018 23:13 IST
मुंबई - परिवहन मंत्री आणि ओला उबेर कंपन्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे ओला-उबेर चालकांनी पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून ओला-उबेर चालक संपावर जाणार आहेत.
Published 14-Nov-2018 22:35 IST
मुंबई - माहुलवासीयांचे पुनर्वसन करावे, यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत कुर्ला येथील एचडीआयएलच्या जागेचा पर्याय सुचवण्यात आला आहे. त्यासाठी १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली.
Published 14-Nov-2018 23:09 IST
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Published 14-Nov-2018 20:11 IST
मुंबई - जिल्ह्यातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये साफसफाई कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामगारांनी थेट आर दक्षिण पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
Published 14-Nov-2018 19:55 IST
मुंबई - धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणारी एक वृद्ध महिला थोडक्यात बचावली. मुलुंड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. लोकल सुरू झाल्यानंतर ही महिला रेल्वे बरोबर काही मीटरपर्यंत फरफटत गेली. शोभा शिंदे (६५) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना मुलुंड स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Published 14-Nov-2018 19:56 IST | Updated 20:15 IST
मुंबई - आझाद मैदान पोलिसांनी हजच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका ट्रॅव्हल एजंटला अटक केली आहे. सर्फराज जैनुद्दीन असे या ट्रॅव्हल एजंटचे नाव आहे. या एजंटने शेकडो हज यात्रेकरुंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
Published 14-Nov-2018 19:50 IST
मुंबई - शहरात १ नोव्हेंबर पासून ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबई शहरातील नागरिकांना सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करावी, अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन आज स्थायी समितीत सादर करण्यात आले असून ही पाणी कपात १५ नोव्हेंबरपासून लागू केली जाणार आहे.
Published 14-Nov-2018 19:28 IST | Updated 21:52 IST
मुंबई - शहरात छठ पूजेदरम्यान घरगुती सिलिंडर गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका ७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. ही घटना अंधेरी पश्चिमच्या कदम नगर एसआरएच्या इमारतीत घडली. या दुदैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Published 14-Nov-2018 19:10 IST
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासासंबंधी राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल एक-दोन दिवसांत येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर सरकारने आत्तापर्यंत आयोगावर तब्बल १३ कोटी १६ लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर ज्या संस्थांनी सर्व्हेक्षणाची भूमिका बजावली त्या संस्थानांवरही तब्बल ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाMore
Published 14-Nov-2018 19:04 IST
मुंबई - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. नेहरु आणि लहान मुले यांचे विशेष नाते होते. एका प्रसंगी लहान मुलानेच नेहरुंचे प्राण वाचवले होते हे आपल्याला माहित आहे का? बालदिनाचे औचित्य साधून आपण जाणून घेणार आहोत याच घटनेबद्दल. ज्यामुळे देशात बालशौर्य पुरस्कार सुरू करण्यात आले.
Published 14-Nov-2018 18:37 IST | Updated 19:09 IST
मुंबई - व्यंगचित्रातून वारंवार निशाणा साधणाऱ्या मनसे अध्यक्ष ठाकरेंना आता भाजपने व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपनेही व्यंगचित्र काढून राज यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा, लोकसभा जवळ आली असतानासुद्धा राज ठाकरे कार्टून काढण्यात व्यस्त असल्याची खिल्ली या व्यंगचित्रातून उडवली आहे. महाराष्ट्र भाजपने ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.
Published 14-Nov-2018 14:59 IST

VIDEO :
video playश्रद्धा कपूरने
श्रद्धा कपूरने 'छिछोरे'च्या शूटींगला केली सुरुवात