Redstrib
परभणी
Blackline
परभणी - शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाली होते. यावेळी बैलगाडीतून कपाशीची बोंडं आणि खराब झालेली सोयाबीन घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
Published 08-Dec-2017 19:05 IST
परभणी - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी रेल्वे स्थानक परिसरात भीमसागर लोटला होता. यावेळी हजारो अनुयायांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
Published 06-Dec-2017 17:30 IST
परभणी - गुजरात येथील निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राजीव सातव गुजरात दौऱ्यावर होते. यादरम्यान सातव यांना गुजरात पोलिसांकडून दिलेली वागणूक आणि कपडे फाडल्याच्या निषेधार्थ आज परभणीत युवक काँग्रेसच्यावतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. तसेच, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
Published 03-Dec-2017 22:34 IST | Updated 22:46 IST
परभणी - दत्त जयंतीचे औचित्य साधून दत्तधाम देवस्थानात उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहराचे आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रयाच्या दर्शनाकरता भक्तांनी गर्दी केली होती.
Published 03-Dec-2017 22:18 IST
परभणी - जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक जिल्हा रुग्णालय परभणी यांच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
Published 01-Dec-2017 17:27 IST
परभणी - सततची होणारी नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर या विवंचनेतून लीमला येथील महिला शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. गंगासागर सुभाष शिंदे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
Published 01-Dec-2017 17:03 IST | Updated 19:22 IST
परभणी - एफडीए, स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने ५ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. शेख रिझवान शेख फरीदमियाँ असे आरोपीचे नाव आहे.
Published 29-Nov-2017 21:10 IST
परभणी - वडिलांवर असलेल्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याच्या १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बोरवंड येथे घडली असून लखन गिराम असे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे.
Published 28-Nov-2017 22:50 IST | Updated 23:03 IST
परभणी - भाजप आघाडीचे सरकार साडेतीन वर्षापासून देशात सत्तेत आले, तर राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. मात्र या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनांच्या नुसत्या खैराती वाटल्या आहेत. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचे आमदार दुर्राणी यांनी सरकारला ठणकावले.
Published 28-Nov-2017 20:10 IST
परभणी - झेन फाऊंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषीक विकास जोशी आणि अमर मांगुळकर यांनी पटकावले तर दुसरे पारितोषीक प्रताप खुराणा आणि विशाल वाघमारे यांना मिळाले.
Published 28-Nov-2017 08:17 IST
परभणी - फडणवीस सरकारने कर्जमाफी सारख्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असल्याच्या भरमसाठ जाहिराती केल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही केला. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात २०१७ च्या १० महिन्यात १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.
Published 26-Nov-2017 15:54 IST | Updated 18:55 IST
परभणी - मराठवाड्यातील ढगाळ वातावरणाचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून हातातोंडाशी आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
Published 24-Nov-2017 20:55 IST
परभणी - जिल्ह्यातील बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने बीटी कपाशीची लागवड करण्याची शिफारस केली होती. मात्र, बीटी कपाशीचा प्रयोग फसल्याने शेतकरी अडचणींच्या गर्तेत सापडला आहे.
Published 23-Nov-2017 21:44 IST
परभणी - राजकारण हे निवडणुकीपुरतेच मर्यादित असावे, विकासासाठी सर्व जनतेने एकत्र आल्यास विकास झपाट्याने होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, मात्र थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होता ते बँकेच्या खात्यात जमा होतील, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. सोनपेठ नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कै. वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळीMore
Published 23-Nov-2017 07:58 IST

खोकला झालाय तर चॉकलेट खा
video playअनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
अनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
video playऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय
ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय