• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
मुख्‍य पानMoreराज्यMoreउस्मानाबाद
Redstrib
उस्मानाबाद
Blackline
उस्मानाबाद - जिल्हा महिला रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसूतीसाठी आलेल्या पारधी समाजातील महिलेकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे बाळाचा व तिचा जीव धोक्यात असतानाही ती रुग्णालयाच्या आवारातच प्रसूत झाली. रुग्णालयाच्या बेफिकीरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.
Published 28-Apr-2017 10:21 IST | Updated 11:45 IST
उस्मानाबाद - खून झाल्याच्या संशयावरून उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी सरणावरील मृतदेह शवविच्छेदानासाठी नेल्याने एकच गोंधळ उडाला. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील वरवटी गावात घडली असून, यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Published 26-Apr-2017 19:52 IST | Updated 20:17 IST
उस्मानाबाद - शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे द्या, चलन तुटवड्याची अडचण असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, अशी मागणी शिवसेनेने केली. या मागणीसाठी उस्मानाबाद येथील शिवसैनिकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांना टाळे ठोकले.
Published 26-Apr-2017 10:51 IST
उस्मानाबाद - ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सायंकाळी ६ वाजता शहरातून नाट्य रसिक आणि कलाकारांची भव्यदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी, संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ठ कलाकार जयंत सावरकर यांच्या हस्ते या दिंडीस प्रारंभ झाला.
Published 22-Apr-2017 13:36 IST
उस्मानाबाद - निवृत्त कलाकारांना दिवसाला फक्त ७० रुपये पेन्शन सरकारकडून दिली जाते. त्यात त्यांनी कसे जगावे ? याचे विश्लेषण मात्र सरकार करत नाही. सन्मानाने जगण्याइतपत पेन्शन वृद्ध कलावंताना मिळत नसल्याची खंत ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.
Published 22-Apr-2017 12:59 IST
उस्मानाबाद - शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच संपर्क कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न केला. परंडा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना बोलावले नव्हते. याचाच राग मनात धरून पाटील यांच्या समर्थकांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.
Published 22-Apr-2017 11:07 IST
उस्मानाबाद - दारू तस्करांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर खूनी हल्ला केला. यावेळी त्यांनी पकडलेल्या सहकाऱ्याची सुटका करत दहशत निर्माण केली. शासकीय कार्यालयातील या हल्ल्यामुळे खळबळ उडाली.
Published 21-Apr-2017 08:07 IST | Updated 10:16 IST
उस्मानाबाद - सरकारी महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Published 18-Apr-2017 11:03 IST
उस्मानाबाद - अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू होण्याच्या अगोदरच उस्मानाबादेत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. नाट्य संमेलनाची वातावरण निर्मिती तसेच जिल्ह्यातील कलाकारांना रंगमंच उपलब्ध व्हावा या पार्श्वभूमिवर हे उद्घाटन केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षीचे ९७ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान होत आहे.
Published 17-Apr-2017 11:24 IST | Updated 12:30 IST
उस्मानाबाद - यावर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दर्जेदार लोकप्रिय नाट्यकलाकृतींची रसिकांना मेजवानी मिळणार आहे. येथे १६ ते २३ एप्रिल दरम्यान ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होत आहे.
Published 15-Apr-2017 19:24 IST
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील पिंपळगावात दोन महिन्यापूर्वी झालेल्या सहा वर्षीय मुलाच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. यात एका मांत्रिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Published 13-Apr-2017 00:15 IST
उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील मार्डी येथे अचानक आग लागून ५ घरे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. ३ शेतकरी व २ भूमीहीन निराधार महिलांनी काबाडकष्ट करून थाटलेल्या संसाराची राख-रांगोळी झाली. घरातील जिवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
Published 11-Apr-2017 12:00 IST
उस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला २१ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. तर समारोपास शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्याचबरोबर पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनाही नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
Published 09-Apr-2017 17:25 IST
उस्मानाबाद - तीर्थक्षेत्र तुळजाभवानी यात्रेच्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या अनुदान घोटाळाप्रकरणी एका ठेकेदाराला अटक करण्यात आली. अद्याप अन्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
Published 07-Apr-2017 20:55 IST

video playनिनावी फोनमुळे पोलिसांनी उचलला सरणावरील मृतदेह

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे