• औरंगाबाद-जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी सरकारी इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • औरंगाबाद - जवान संदीप जाधव यांचे पार्थिव शनिवारी सकाळी गोकूळवाडीत दाखल होणार.
  • औरंगाबाद - जवान संदीप जाधव यांचे पार्थिव आज रात्री औरंगाबादमध्ये आणण्यात येणार.
  • औरंगाबाद-पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात औरंगाबादचे सुपुत्र संदीप जाधव (३५) शहीद.
  • पाकिस्तानात पेशावरजवळ शक्तिशाली स्फोट, १५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी.
Redstrib
नांदेड
Blackline
नांदेड - सिडको रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
Published 23-Jun-2017 21:33 IST | Updated 21:51 IST
नांदेड - मोटार सायकलसाठी माहेराहून पैसे का आणत नाहीस म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेस विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नवऱ्यासह सासरा, दीर या तिघांना तीन वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
Published 19-Jun-2017 22:31 IST
नांदेड - हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला येणाऱ्या ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान, आरोपी रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, या निमित्ताने पुन्हा गांजाच्या तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.
Published 19-Jun-2017 17:07 IST
नांदेड - रिक्षा चालकांच्या विविध मागण्या, प्रश्न जनसेवा ऑटो टॅक्सी संघटनेच्या माध्यमातून सोडविणारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे यांचा आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान त्यांचा मृत्यू वाहतूक शाखेतील सहपोलीस निरिक्षक मारोती निकम यांच्या त्रासामुळे झाला असल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली.
Published 16-Jun-2017 22:23 IST
नांदेड - रेशनच्या शासकीय वितरणाच्या गहू व तांदुळ विक्रीच्या उद्देशाने अवैधरित्या साठा करणार्‍या २ जणांना पोलिसांनी अटक केली. खुदबेनगर येथील राहणाऱ्या या आरोपींच्या घरावर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संबंधितांकडून जवळपास २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Published 16-Jun-2017 15:13 IST
नांदेड - शहरातील सोमेश कॉलनी भागातून क्रिकेटवर सट्टेबाजी करणाऱ्या गँगचा पोलिसांच्या पथकाने छापा मारून पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Published 16-Jun-2017 13:56 IST
नांदेड - भरधाव जाणारी बिलोली आगाराची बस नायगाव नरसी दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने रजा इंग्लिश स्कूलजवळ विद्युत पोलला धडकून पलटली. यात बसमधील ७ प्रवासी जखमी झाले. जखमीपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नांदेडला पाठवण्यात आले आहे.
Published 16-Jun-2017 13:39 IST
नांदेड - जिल्ह्यात आगामी काळातील रमजान ईद, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि विविध प्रकारच्या संभाव्य आंदोलनाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी सोमवार १२ जून ते २६ जून २०१७ रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
Published 16-Jun-2017 07:21 IST
नांदेड - माहूर येथील गेल्या एक महिन्यापासून रिक्त असलेल्या रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची सूत्रे जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारने यांनी गुरवारी स्वीकारली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी, आदींकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
Published 16-Jun-2017 07:08 IST
नांदेड - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजांचा कडकडाट होऊन पाच महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. उमरी तालुक्यातील मौजे कारला येथील आस्वल दरिचा माळ परिसरात ही घटना घडली. येथील भुताळे यांच्या शेतात आज (सोमवारी) सायंकाळी ४:२० वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली.
Published 12-Jun-2017 19:17 IST
नांदेड - लोहा-कंधार रोडवर बस आणि ऑटो रिक्षामध्ये झालेल्या अपघातात एका १२ वर्षाच्या चिमूरडीचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. भाग्यश्री बाबुराव घंटलवाड असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
Published 11-Jun-2017 19:24 IST
नांदेड - बिघडलेल्या टिप्परला दुरूस्त करताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत सय्यद अजीमोद्दीन सय्यद नसीरोद्दीन हा ठार झाला, तर इतर ३ जण जखमी झाले. ही घटना भोकर - नांदेड रस्त्यावरील खरबी शिवारात ८ जूनच्या रात्रीला घडली.
Published 10-Jun-2017 16:00 IST
नांदेड - सध्या राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरलेला दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिछोन्डी येथे एका शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
Published 10-Jun-2017 13:55 IST
नांदेड - नांदेड-लोहा रस्त्यावरील कारेगाव गावाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अशोक वैजनाथ सुरवसे (रा. सोनीमोहा ता. धारूर जि. बीड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Published 10-Jun-2017 08:44 IST

शिवारात गांजाचे पोते फेकून आरोपी फरार
video playविवाहितेस विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न;...
विवाहितेस विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न;...
video playट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

आता डेंग्यू, चिकनगुनियास कारणीभूत डास होतील नामशेष
video playअतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन
अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन

video play२५ ऑगस्ट रोजी येतोय
२५ ऑगस्ट रोजी येतोय 'बाबूमोशाय बंदूकबाज' !