• अकोला : लग्नाचे आमिष देऊन तरुणीसोबत जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध
  • अकोला : पीएसआय दीपक शालिग्राम निंबाळकर विरोधात बलात्काराचा गुन्हा
  • बीड : आमदार मेटेंचे नाव उद्घाटन पत्रिकेत नाही म्हणून डॉक्टरला मारहाण
  • बीड : आमदार विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरला मारहाण
  • यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावर अपघात, दोघे जागीच ठार तर दोघे गंभीर
  • कोल्हापूर : सातारा वगळता राज्यातील ४७ जागांवर महाराष्ट्र क्रांती सेना लढणार
  • कोल्हापूर : महाराष्ट्र क्रांती सेनेने जाहीर केली लोकसभेच्या १४ उमेदवारांची यादी
Redstrib
लातूर
Blackline
लातूर - शहरातील सराफा बाजारातील ३ दुकानांवर तर कापड बाजारातील एका दुकानासह अन्य २ ठिकाणी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली. दुकानातील व्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Published 21-Jan-2019 18:54 IST
लातूर - उदगीर येथे श्री गुरू हावगीस्वामी यात्रेनिमित्त आयोजित महोत्सवात लैलाच्या गाण्यावर नर्तिकेसोबत चक्क नगरसेवक थिरकल्याचे पाहायला मिळाले. गणेश गायकवाड असे नगरसेवकाचे नाव असून, त्यांच्याच नृत्याची सर्वत्र चर्चा होती. विशेष म्हणजे गायकवाड हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत.
Published 21-Jan-2019 18:27 IST | Updated 20:06 IST
लातूर - बँका कर्ज देताना विमा पॉलिसीच्या नावाखाली कशी पिळवणूक करतात याचा व्हिडिओ योगेश शेळके या तरुणाने समोर आणला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे फसवणूक झालेले शेतकरी आता समोर येऊन आपली फसवणूक बँकांनी कशी केली. याबद्दल सांगत आहेत. असाच फसवणुकीचा प्रकार लातूर तालुक्यातील गातेगाव येथील शेतकऱ्यांबरोबर झाला. त्याने 'ईटिव्ही भारत'शी बोलताना आपली व्यथा मांडली.
Published 21-Jan-2019 13:05 IST | Updated 18:04 IST
लातूर - ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अहमदपूरच्या एल. आय. सी कार्यालयासमोर घडला.
Published 20-Jan-2019 22:05 IST
लातूर - बँकेकडून कर्ज हवे असल्यास बजाज एलायंजची विमा पॉलिसी काढा, अशी अट बँकांकडून शेतकऱ्यांना घालून त्यांची कशापद्धतीने लुट सुरू आहे. याचा व्हिडीओ योगेश शेळके नावाच्या तरुणाने व्हायरल केला आहे. याबाबत बँक आणि बजाज एलायंज कंपनीने हात वर केले असले तरी शेतकऱ्यांनी हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले आहे.
Published 19-Jan-2019 17:17 IST
लातूर - शहरातील बार्शी रोडवरील बिडवे महाविद्यालयासमोर रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. शिवम उमाकांत मेंगले असे या रिक्षाचालकाचे नाव असून तो बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
Published 19-Jan-2019 16:38 IST | Updated 17:06 IST
लातूर - मुलाने घरी आत्महत्या केल्याचे समजताच आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार निलंगा तालुक्यातील निटूर गावात घडला. आई-मुलाने एकाच दिवशी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Published 18-Jan-2019 23:26 IST | Updated 23:47 IST
लातूर - बजाज एलायंज कंपनी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेबरोबर करार करून शेतकऱ्यांची कशी फसवणूक करीत आहे, याचा पोलखोलच एका तरुणाने केला आहे. परदेश वारीची संधी मिळावी यासाठी शाखा व्यवस्थापक आणि कंपनी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा दावा या तरुणाने व्हिडिओतून केला होता. याप्रकरणी जिल्ह्यात राजकारण तापले असून जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बजाज एलायंज कंपनीमध्ये शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
Published 18-Jan-2019 21:28 IST | Updated 23:08 IST
लातूर - राज्यात शिक्षण क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्नची एक वेगळी ओळख आहे. आता मैदानी खेळातही लातूर पॅटर्न पुढे येणे गरजेचे आहे. जे नवे ते लातूरकरांना हवे हे आजही सिद्ध झाले आहे. १५० फूट उंचीचा तिरंगाही लातूरकरांनीच फडकविला आहे. त्यामुळे मैदानी खेळही लातूरकरच निर्माण करतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
Published 18-Jan-2019 18:53 IST
लातूर - शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात लातूरकरांनी आज १५० फूट उंच राष्ट्रध्वजाला सलामी दिली. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तावडे यांच्यासह एक शालेय विद्यार्थ्यालाही संधी देण्यात आली.
Published 18-Jan-2019 13:36 IST
लातूर - अहमदपूरमधील उपविभागीय कार्यालयातील कारकुनास ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. धनंजय पांडुरंग पवळे (५६) असे या लाचखोर कारकुनाचे नाव आहे.
Published 17-Jan-2019 23:07 IST
लातूर - भविष्य निर्वाह निधीमधून विनापरवाना दाखल केलेला प्रस्ताव त्वरीत मार्गी लावण्यासाठी कनिष्ठ लिपिकास १ हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र रघुनाथ भुतेकर असे लिपिकाचे नाव आहे.
Published 17-Jan-2019 20:57 IST
लातूर - शेतातील विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. शेतजमीन आणि क्षुल्लक कारणावरून भावकित होणारे भांडण टोकाला पोहचले आणि हा प्रकर घडला. आकाश साठे असे मृत युवकाचे नाव आहे.
Published 17-Jan-2019 20:48 IST
लातूर - देवणी तालुक्यातील हिसामनगर येथे मंगळवारी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी बुधवारी देवणी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 16-Jan-2019 22:33 IST

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ