• मुंबई- चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर मार्ग विस्कळीत
  • गुजरात निवडणूक- दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
  • नागपूर- हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधकांचा सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा
  • नागपूर- काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचे शरद पवार करणार नेतृत्व
  • न्यूयॉर्क - टाइम्स स्क्वेअरजवळ स्फोट, संशयित ताब्यात
Redstrib
जालना
Blackline
जालना - औरंगाबाद रोडवरील विशाल कॉर्नर येथे २ वाहनावर छापा मारून २२ लाख रूपये किंमतीचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र राजकीय दबामुळे उशिराने गुन्हा नोंदवला गेला.
Published 18-Aug-2017 10:04 IST
जालना - पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला. विवाह झाल्यानंतर नवऱ्याला तिने तीन दिवस स्पर्श करु दिले नाही. त्यानंतर नवरा झोपी गेल्यानंतर लग्नातील सर्व पैसे व दागिने घेवून पोबारा केल्याची घटना हिवरा येथे घडली. याप्रकरणी वधू-वर सूचक केंद्र चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Published 17-Aug-2017 21:29 IST
जालना - जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व दुष्काळाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विलास बाबुराव ढाकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली.
Published 16-Aug-2017 16:22 IST
जालना - जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उस्वद येथील एका शेतकऱ्याने दुष्काळाच्या भीषण दहाकतेला कंटाळून स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. पांडुरंग हरिभाऊ लोमटे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 13-Aug-2017 13:52 IST
जालना - शहराबाहेरील पारडगाव रस्त्याच्या बाजूला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते. सलग दोन दिवस अशा घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Published 10-Aug-2017 09:41 IST
जालना - बँकेतून पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींची रक्कम लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चौकशीत त्यांनी जालना, पाटोदा, पैठण, गेवराई, अहमदनगर येथे लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
Published 10-Aug-2017 09:30 IST
जालना - वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षकाकडून २ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक व शिपायाला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी केली असून वरिष्ठ सहाय्यक मनोहर देवराव शेळके व शिपाई पवन रमेश नलावडे अशी त्या लाचखोरांची नावे आहेत.
Published 10-Aug-2017 08:35 IST
जालना - कर्जप्रस्ताव मंजुरीसाठी एका बेरोजगाराकडून लाच घेताना 'महाराष्ट्र उद्योजकता केंद्राच्या' मानद व्याख्यात्यास लाचलुचपत प्रतिबंध पथकाने पकडले. जिल्हा उद्योग केंद्राच्या परिसरातील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात सापळा लावून दोन हजाराची लाच घेताना अशोक सोनवणे यांना रंगेहात पकडण्यात आले.
Published 08-Aug-2017 17:10 IST
जालना - बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यात घडली आहे. किशोर नवनाथ लांडे (वय २७) असे या शेतकर्‍याचे नाव आहे.
Published 04-Aug-2017 22:13 IST
जालना - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यात लोखंडी मुसळी मारून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना चंदनझिरा परिसरात घडली आहे. घटनेनंतर आरोपी भूपेंद्र यादव हा फरार झाला आहे.
Published 04-Aug-2017 22:05 IST
जालना - जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे देण्यासंह शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
Published 03-Aug-2017 09:42 IST | Updated 09:53 IST
जालना - व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचा धनादेश न वटता बँकेतून परत आल्याने चेक देणार्‍या आरोपीस भोकरदन येथील दिवाणी न्यायालयाने १४ लाखाचा दंड व आठ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
Published 02-Aug-2017 10:44 IST
जालना - जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी बक्कलगुडा भागात घडली. आकाश ऋषी टेकूर (२५) असे या गोळीबारातील जखमी तरुणाचे नाव आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Published 28-Jul-2017 19:46 IST
जालना - एका भामट्याने मोबाईलद्वारे संर्पक साधून 'मी बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड डिजिटल करायचे आहे, असे सांगत त्याचा पिन नंबर मागितला. यानंतर त्या शिक्षिकेच्या खात्यातून परस्पर २ लाख ८० हजार रूपये काढल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवारी बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 26-Jul-2017 17:52 IST

खोकला झालाय तर चॉकलेट खा
video playअनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
अनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
video playऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय
ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय

video play
'धाकड गर्ल' छेडछाड प्रकरणी विकास सचदेवला अटक
video play
'चिठ्ठी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत धनश्री काडगावकर !