• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
जालना
Blackline
जालना - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण सायंकाळी पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेच्या ५६ गटांचे व ११२ गणांचे निकाल लागले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सर्वच तालुक्यातून चांगल्या प्रकारे मत्ताधिक्य मिळाल्याने जिल्ह्यात भाजप पक्षाने क्रमांक एकचा पक्ष म्हणून बाजी मारली आहे.
Published 24-Feb-2017 19:19 IST
जालना - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीस सकाळी प्रारंभ झाला असून दुपारपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५६ गटांपैकी ४० गटांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये सेना - १०, भाजप - १६, काँग्रेस - ४, राकाँ - ८ व अपक्ष - २ जागा मिळाल्या असून अद्याप १६ गटांचे निकाल येणे बाकी आहे.
Published 23-Feb-2017 15:42 IST
जालना - जालना जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान १६ फेब्रुवारी रोजी झाले असून उद्या दि. २३ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणाच्या पारड्यात जास्त मतदान पडून कोणाचे उमेदवार निवडून येतील व जि. प. ची सत्ता कोणाकडे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published 22-Feb-2017 22:35 IST
जालना - जालना जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल उद्या दि. २३ फेब्रुवारी रोजी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
Published 22-Feb-2017 20:00 IST
जालना - मानवरहित रेल्वेगेटजवळ रेल्वे आणि मोटारकारच्या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रवाशांच्या वारसांना मोटारवाहन कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई म्हणून तीस लाख रूपये देण्यात यावेत, असे निर्देश येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशपांडे यांनी रेल्वे प्रशासन आणि वाहन विमा कंपनीला नुकतेच दिले.
Published 22-Feb-2017 13:51 IST
जालना - अंबड येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापकाला १० हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. कपिल अंबट असे त्या लाचखोर भूमापकाचे नाव असून अंबड येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
Published 22-Feb-2017 08:36 IST
जालना - रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी सामाजिक, शैक्षणिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने साजरी करण्यात आली. जालना शहरात शिवजयंती निमित्त सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य ढोल-ताश्यांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. चमन येथून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
Published 20-Feb-2017 14:32 IST
जालना - ज्या महापुरूषांनी या देशात समतेचा विचार मांडला त्यांना संपविण्याचे षडयंत्र रचल्या जात असून आज महापुरूषांना जातीय चौकटीत बंदिस्त करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विचारवंत व लेखक प्रा. राजा शिरगुपे यांनी केले.
Published 19-Feb-2017 22:59 IST
जालना - नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाचे सर्वेक्षण व मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गावरील सर्व संबंधित शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य तो मोबदला हस्तांतरानंतर तात्काळ दिला जाणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Published 19-Feb-2017 19:18 IST | Updated 23:00 IST
जालना - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जालना शहरातील कन्हैयानगर, मंगळबाजार आणि पाचनवडगाव येथील दारू अड्डयांवर छापे मारले. या छाप्यात हातभट्टीच्या दारूसह रसायन नष्ट करण्यात आले. यावेळी ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला ताब्यात घेतले.
Published 19-Feb-2017 18:13 IST | Updated 10:21 IST
जालना - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा मतदान केंद्रावर सरकारी लवाजम्यासह प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी मंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 18-Feb-2017 12:43 IST
जालना - जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सरासरी ७०.१८ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागातून महिला, पुरूष आणि वृद्ध मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
Published 17-Feb-2017 11:59 IST
जालना - परतूर तालुक्यातील गणेशपूर गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षीय शेतकरी, लक्ष्मण प्रभत सागडे यांनी कर्जबाजरीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.
Published 16-Feb-2017 10:41 IST
जालना - जिल्ह्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हाप्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील सर्व संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रावर चोख बंदोबस्त लावण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी यावेळी सांगितले.
Published 15-Feb-2017 20:42 IST

video playस्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी
स्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे