• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
जालना
Blackline
जालना - अवैध सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरावर छापे टाकून कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. परतूर तालुक्यातील आष्टी विभागीय निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद व जिल्हा उपनिबंधक संस्था जालना यांच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकून ५० कागदपत्रे हस्तगत केली.
Published 10-Mar-2017 07:59 IST
जालना - मित्रांसोबत पोहण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महादेव विठ्ठल थोरात असे त्या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना परतूर येथे बुधवारी घडली.
Published 09-Mar-2017 12:34 IST
जालना - गुरूपिंप्री (ता. घनसावंगी) येथे रामभाऊ साबळे या जन्मदात्या पित्याचा किरकोळ कारणावरून डोक्यात तिक्ष्ण हत्यार घालून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी सुरेश साबळे यास जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशपांडे यांनी सुनावली.
Published 04-Mar-2017 11:26 IST
जालना - २३ फेब्रुवारी रोजी देशसेवा करत असताना सिमेवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मेजर अमरदिपसिंग देहल गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पथकातील ३ जवान शहीद झाले. मेजर अमरदिपसिंग देहल यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली.
Published 04-Mar-2017 10:32 IST
जालना - येथील मोदीखान्यात निलेश निर्मलचंद कासलिवा यांच्या घरी झालेल्या घरफोडीतील चोरांना पडकण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. बीड येथील अट्टल गुन्हेगारास गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.
Published 02-Mar-2017 20:14 IST
जालना - नुतन वसाहत उड्डाण पुलाजवळ सोमवारी सकाळी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. शमुवेल रतन पवार असे त्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्याचा मित्र सुरेश नेमाडे हा जखमी झाला आहे.
Published 01-Mar-2017 14:21 IST
जालना - जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी. निधी खर्च न करणार्‍या संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
Published 01-Mar-2017 10:15 IST
जालना - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षांना जिल्ह्यातून २२ हजार ४०० विद्यार्थी बसले होते. मंठा येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने ३ जणांना कॉपी करतांना पकडले आहे.
Published 01-Mar-2017 10:10 IST
जालना - पारडगाव रेल्वे स्टेशनजवळ परतूरकडे काही अंतरावर नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसखाली येऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना (२७ फेब्रुवारी) रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
Published 28-Feb-2017 12:07 IST
जालना - नगर परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे चांगलीच गाजली. या सभेत अनेक विषयावर चर्चा होऊन विकास कामांच्या खर्चावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे.
Published 27-Feb-2017 22:55 IST
जालना - मंठा तालुक्यातील किर्ला गावाजवळील पूर्णा नदीपात्रात वाळूच्या टिप्परने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तुकाराम रामभाऊ कांगणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Published 27-Feb-2017 12:55 IST
जालना- शहरातील जुना जालना भागातील सरस्वती भुवन शाळेच्या परिसरात एकाच रात्री ५ दुकानांचे शटर तोडून रोख रक्कमेसह साहित्य लंपास केले. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published 26-Feb-2017 22:44 IST
जालना - मंठा तालुक्यामधून जाणाऱ्या तळणी ते लोणार या मार्गावर ऊसाच्या ट्रॅक्टरखाली येऊन १२ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात गुरुवारी सायकांळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. लोणारकडे ऊस वाहून नेणारा ट्रॅक्टर वसंतनगर मधून जात असताना रस्ता ओलांडणारी वैशाली मुदळकर (१२ वर्ष) ही मुलगी ट्रॅक्टरखाली येऊन जागीच ठार झाली.
Published 24-Feb-2017 20:44 IST
जालना - जिल्ह्यात भाविकांनी शिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी केली. शहरातील महादेव मंदिरात भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील पंचमुखी महादेव मंदिर, घृष्णेश्‍वर तसेच मंठा तालुक्यातील शंभू महादेव मंदिर, भोलेश्‍वर बरडी संस्थान यासर्व मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
Published 24-Feb-2017 20:05 IST

video playस्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी
स्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण