• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
जालना
Blackline
जालना - जिल्ह्यातील जाफ्राबाद उपविभागाअंतर्गत कार्यरत असेले तंत्रज्ञ सुभाष देविदास कुलकर्णी हे ट्रान्सफार्मरवर रविवार सांयकाळी दुरूस्तीचे काम करत होते. यावेळी नजरचुकीने विद्युत प्रवाह चालू राहिल्याने त्यांना वीजेचा तीव्र धक्का बसला. यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Published 28-Aug-2017 17:02 IST
जालना - घरातून गायब झालेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह भालगाव रोडवर आढळून आला आहे. गोविंद शिवप्रसाद गगराणी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अंबडच्या नुतन वसाहत परिसरात राहणारा होता.
Published 28-Aug-2017 15:38 IST
जालना - जिल्ह्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाने चैतन्यमय व भक्तीमय वातावरण आहे. शहरात बाप्पाचे ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
Published 25-Aug-2017 21:22 IST
जालना - बदनापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. २४ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. महेबुब खान उस्मान खान पठाण असे त्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या पोलीस ठाण्यात वर्षभरातील लाच प्रकरणाबाबत केलेली ही तिसरी कारवाई आहे.
Published 25-Aug-2017 11:30 IST | Updated 11:31 IST
जालना - गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी जालना शहरातून विशेष पोलीस पथसंचलन करण्यात आले.
Published 24-Aug-2017 18:14 IST
जालना - जिल्हयात पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकर्‍यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. शेतकर्‍यांनी बैलांची सवाद्य मिरवणूक काढून त्यांची यथोचित पुजा केली. गावागावातून मिरवणूक काढल्याचे चित्र या सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागात पाहावयास मिळाले.
Published 21-Aug-2017 22:49 IST
जालना - गेल्या दीड महिन्यापासून वरूण राजाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची अक्षरक्ष: राखरांगोळी झाली होती. दीड महिन्याच्या विश्रातीनंतर जालना शहरासह जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे. शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजरी लावली.
Published 21-Aug-2017 14:59 IST
जालना - वरूणराजाला साकडे घालण्यासाठी जालना येथील विविध संघटना व मुस्लीम बांधवांच्या वतीने कदिम जालना येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून, त्वरित पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
Published 19-Aug-2017 10:06 IST
जालना - मराठवाड्यासह जालना जिल्ह्याला गेल्या दीड महिन्यापासून वरूणराजाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. दोन दिवसांवर शेतकऱ्यांचा महत्वाचा पोळा सण आला असून दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तेरा दिवसात मराठवाड्यात तब्बल ४९ शेतकऱ्यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Published 18-Aug-2017 15:19 IST
जालना - औरंगाबाद रोडवरील विशाल कॉर्नर येथे २ वाहनावर छापा मारून २२ लाख रूपये किंमतीचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र राजकीय दबामुळे उशिराने गुन्हा नोंदवला गेला.
Published 18-Aug-2017 10:04 IST
जालना - पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला. विवाह झाल्यानंतर नवऱ्याला तिने तीन दिवस स्पर्श करु दिले नाही. त्यानंतर नवरा झोपी गेल्यानंतर लग्नातील सर्व पैसे व दागिने घेवून पोबारा केल्याची घटना हिवरा येथे घडली. याप्रकरणी वधू-वर सूचक केंद्र चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Published 17-Aug-2017 21:29 IST
जालना - जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व दुष्काळाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विलास बाबुराव ढाकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली.
Published 16-Aug-2017 16:22 IST
जालना - जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उस्वद येथील एका शेतकऱ्याने दुष्काळाच्या भीषण दहाकतेला कंटाळून स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. पांडुरंग हरिभाऊ लोमटे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 13-Aug-2017 13:52 IST
जालना - शहराबाहेरील पारडगाव रस्त्याच्या बाजूला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते. सलग दोन दिवस अशा घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Published 10-Aug-2017 09:41 IST

video playशेतात काम करताना वीज पडल्याने महिलेचा मृत्यू; १ जखमी
शेतात काम करताना वीज पडल्याने महिलेचा मृत्यू; १ जखमी

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव