• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
जालना
Blackline
जालना - टेंभुर्णी-कुंभारझरी रस्त्यावरील भानोडी शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर नाल्यात उलटला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. दत्तु उत्तम जोशी (२५), असे मृत चालकाचे नाव आहे.
Published 03-Apr-2017 14:50 IST
जालना - सासरच्या छळाला कंटाळून विवाहतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ढेंग येथे घडली असून वर्षा बनसोडे (२०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
Published 03-Apr-2017 14:05 IST
जालना - प्रयत्न करण्याची तयारी असली, तर राजकारणात यशस्वी होता येते. राजकारणात शिस्त व परिश्रमाने यश मिळते, असा कानमंत्र पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींना दिला. ते नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींच्या पदग्रहण व सत्कार सोहाळ्याप्रसंगी बोलत होते.
Published 03-Apr-2017 10:08 IST
जालना - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त मातोश्री लॉन्स येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
Published 02-Apr-2017 19:34 IST
जालना- जिल्ह्यासह शहरात तापमानात अचानक प्रचंड वाढ झाली असून तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांना सकाळपासूनच उन्हापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. नागरिक सकाळपासूनच डोळ्यांना गॉगल आणि डोक्याला रूमाल बांधून घराबाहेर पडत आहेत. प्राण्यांना देखील उन्हाच्या चटक्यांचा त्रास जाणवत आहे.
Published 30-Mar-2017 21:58 IST
जालना - औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक विठ्ठलसिंग बजरंगसिंग मुराडे यांना पाच हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
Published 30-Mar-2017 20:40 IST
जालना - आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी सरकारचा निषेध करत सोमवारी काँग्रेसच्यावतीने अंबड येथे रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको दरम्यान कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांचे कर्जमाफ झालेच पाहिजे, आमदारांचे निलंबन मागे घ्या आदी मागण्यांसाठी सरकारविरोधात घोषणा दिल्या. मात्र या रास्ता रोकोमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Published 28-Mar-2017 12:09 IST
जालना - जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. रामदास उत्तम अंभोरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 27-Mar-2017 17:04 IST
जालना - उद्योजक सुरेंद्र पित्ती यांनी मातोश्रीच्या स्मरणार्थ सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी ११ लाख रूपयांचा धनादेश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्याकडे सुपूर्द केला.
Published 27-Mar-2017 07:38 IST
जालना - चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व चिवचिवाट सतत ऐकायला मिळावा, यासाठी नेचर फॉरएव्हर सोसायटी व अमीजिवदयाच्या वतीने बर्ड फिडर व घरट्यांचे येत्या २८ मार्च रोजी शहरात प्रदर्शन आयोजित करण्या येणार आहे.
Published 26-Mar-2017 22:15 IST | Updated 22:26 IST
जालना- प्रतिभावंताचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 'उर्मी' च्यावतीने दिला जाणारा उर्मी राज्य काव्य पुरस्कार यंदा वैदर्भीय बोलीभाषेचे प्रख्यात कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे.
Published 25-Mar-2017 22:51 IST
जालना - अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव शिवारात गेल्या ४ दिवसांपासून बिबट्यासारखा दिसणारा प्राणी शेतकर्‍यांना आढळून आला आहे. सलग २ रात्री गाय व नंतर काळविटाचा बळी घेतल्याने या शिवारात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे.
Published 25-Mar-2017 10:44 IST
जालना - शहरात सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस शिपाई पदाच्या ४२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सात हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
Published 23-Mar-2017 16:17 IST
जालना- शहरातील नगरपालिका हद्दीत असलेल्या अवैध मोबाईल टॉवरधारकांवर नगरपालिकेच्या वसुली पथकाने कारवाई केली आहे. रिलायन्स कंपनीचे अनधिकृत टॉवर सील करत परवाना नसलेल्या ३ टॉवरचालकांकडून एकूण १ कोटी ७९ लाख १७ हजार रूपयांचा दंड त्यांनी आकारला आहे.
Published 23-Mar-2017 16:08 IST

video playस्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी
स्कॉर्पिओ-पिकअपची धडक, आमदारासह ६ जण जखमी

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण