सांकेतिक छायाचित्र
जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील काही गावातील मरेगाच्या कामांची पाहणी करून मजुरांशी चर्चा केल्यानंतर जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कॉ. करात म्हणाल्या की, उत्तरप्रदेश, उत्तराखंडासह इतर राज्यातील मतांची संख्या लक्षात घेतली तर भाजप मतांच्या ५० टक्केही जवळ नाही. या निवडणुकीत भाजपाने धन आणि धर्माचा वापर करून निवडणुका जिंकल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
मनरेगा गरिबांची लाईफलाईन असून गावागावात दौरे करून मनरेगा कामांची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेवून त्याचा अहवाल सरकारसमोर मांडणार असल्याचे असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, शेतकर्यांना शेतजमिनी असून प्रत्यक्षात त्यांची अवस्था अत्यंत दयनिय आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जात बुडाला आहे. मनरेगाअंतर्गत कामे देण्याची सरकारची जबाबदारी आहे. मजुरांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात मनरेगाची कामे बंद असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत ही बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.