• नवी दिल्ली - जिनपिंग यांच्याशी खास चर्चेसाठी आज पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर
  • नाशिक - शिवसेनेत अंतर्गत वाद, राऊतांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची दांडी
  • लातूर - संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना दिला कचरा भेट
  • अकोला - संभाजी ब्रिगेडकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड
  • मुंबई - कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा मार्ग मोकळा - बडोले
  • नवी दिल्ली - लोकांनी खरे संत आणि भोंदू यांच्यात फरक करावा - अशोक गेहलोत
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये राजकीय कार्यकर्त्याची हत्या
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
Redstrib
जालना
Blackline
जालना - विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना बुधवारी उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांतील मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
Published 12-Apr-2018 16:05 IST
जालना - शेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. शेतकर्‍यांना दर्जाहिन बियाण्यांची विक्री करणार्‍या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम २०१८ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
Published 11-Apr-2018 08:25 IST
जालना - शेतीचे राष्ट्रीयकरण करून सप्रमाण वाटप व्हावे, शेतकर्‍यांना बियाणे, खते, सिंचनाच्या सुविधा, बाजारपेठ शासनाने उपलब्ध करून द्यावे, असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धरला होता. आज शेतीचे तुकडीकरण झाले असून दरडोई उत्पन्न घटल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. त्यावर जालीम उपाय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मार्गदर्शक तत्वे लागू करावी लागतील, असे मत मंठ्याचे तहसिलदार डॉ. राहुलMore
Published 11-Apr-2018 07:46 IST
जालना - जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जालना तालुक्यातील वखारीसह मंठा, परतूर परिसरात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे झाले. या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे शेतात उभ्या पिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.
Published 10-Apr-2018 22:46 IST
जालना - मराठवाडयासह जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणार्‍या ड्रायपोर्टचे काम युध्दपातळीवर सुरू असून खाजगी व शासकीय जमिनीच्या भूसंपादनासाठी १६ कोटी १५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याबाबत संबंधित जमिनीचे खरेदी खत करून शेतकर्‍यांच्या खात्यावर किंवा आरटीजेएसद्वारे त्यांच्या मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
Published 09-Apr-2018 08:20 IST
जालना - दरवाढीच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मात्र, सरकारला कसलेच गांभिर्य नसल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे.
Published 08-Apr-2018 08:58 IST
जालना - कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. देशभरातून आलेल्या ३९५ खेळाडुंनी सतत २४ तास स्केटिंग करून गिनेस बुकमध्ये आपल्या विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या ९ खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करत हा किताब पटकावला, त्यातील खेळाडुंचा आज सत्कार करण्यात आला.
Published 07-Apr-2018 22:10 IST
जालना - पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान ५० शिपायांच्या जागेसाठी पात्र ठरलेल्या १ हजार २५७ उमेदवारांची शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेर्‍याद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती.
Published 07-Apr-2018 16:43 IST
जालना - जिल्ह्याला उद्योगामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उद्योगाच्या माध्यमातून बेराजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. उद्योग टिकून राहण्याबरोबरच भरभराटीस येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
Published 06-Apr-2018 16:12 IST
जालना - विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी ११ वाजता सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. शहरातील गांधी चमन या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. खामगाव-जळगाव-जालना-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या मंजुरीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
Published 04-Apr-2018 14:07 IST
जालना - देशात उच्च शिक्षणाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत केवळ सरकारवर अवलंबून न राहता सर्वांनी मिळून लोकसहभागातून काम केल्यास परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
Published 04-Apr-2018 08:30 IST
जालना - अंगारकी चतुर्थीनिमित्‍त श्री राजुरेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. लाखो भाविकांनी राजुरेश्‍वराचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी समाधान व कविता म्हस्के दाम्पत्याला दर्शन रांगेतील पहिल्या दर्शनाचा मान मिळाला.
Published 03-Apr-2018 21:05 IST
जालना - आरोग्य कर्मचार्‍यांबरोबरच आशा सेविकांनी निस्वार्थ भावनेने कर्तव्य बजावून ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषेदेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
Published 02-Apr-2018 09:52 IST
जालना - नागपूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या संस्कृत प्राज्ञ परीक्षेत बदनापूर येथील महानुभाव आश्रमातील विद्यार्थीनी पूजा धाराशिवकर हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारोहात कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काने यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन तिला सन्मानित करण्यात आले.
Published 02-Apr-2018 07:55 IST

कार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर
video playनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे ताब्यात
नऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे ताब्यात

video play
'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा