• पुणे- शार्दूल जाधव यांना 'अजित युवा पुरस्कार' जाहीर
  • पुणे- निगडी पोलिसांकडून पहाटे २ गुन्हेगारांना अटक, २ पिस्तूल जप्त
  • नागपूर- युग चांडक प्रकरण : अल्पवयीन आरोपी दोषी,आज निकाल
  • जम्मू-पठाणकोट रस्त्यावर अपघात, १ ठार तर २२ जण जखमी
Redstrib
जालना
Blackline
जालना - गुन्हा दाखल असताना त्यात पुढील कारवाई टाळण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्यातील जमादाराने आरोपीच्या नातेवाईकाकडून लाच घेतली. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव आत्माराम श्रीराम अंभोरे असे आहे.
Published 20-Jul-2017 08:03 IST
जालना - शहरात सध्या बेशिस्त वाहतुकीमुळे व कासवगतीने चाललेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहन चालकांना कामावर नियोजित वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांसह सरकारी कर्मचारी व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
Published 18-Jul-2017 08:22 IST | Updated 08:22 IST
जालना - शहरातील संभाजीनगर परिसरात खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी एक लाख रुपये रकमेची चोरी केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. भरवस्तीत झालेल्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
Published 15-Jul-2017 16:07 IST
जालना - शहरातील पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागातील रेकॉर्डरूमला मंगळवारी लागलेल्या आगीत जुन्या फाईलिंची राखरांगोळी झाली. अनेक महत्वाचे दस्तावेज या आगीत भस्मसात झाले आहेत.
Published 12-Jul-2017 22:35 IST
जालना - शहरापासून जवळच असलेल्या कुंभेफळ येथे गायरान जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या गावठी व देशी दारूची विक्री केली जात आहे. याविरोधात मंगळवारी येथील महिलांनी एल्गार पुकारत थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून अधीक्षकांना निवेदन दिले.
Published 12-Jul-2017 07:56 IST
जालना - येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी सुकाणू समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफाशींची अंमलबजावणी करावी, यासह सुकाणू समितीच्या पुढील टप्प्यातील आंदोलनाच्या नियोजनावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Published 11-Jul-2017 14:55 IST
जालना - शहरापासून जवळच असलेल्या खरपुडी रस्त्यालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून एका घरात वेश्याव्यवसाय चालत होता. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय कार्यालयाच्या विशेष पथकासह दामिनी पथकाने रविवारी संयुक्तरित्या कारवाई केली. यावेळी दोन महिला व दोन पुरूषांना ताब्यात घेतले आहे.
Published 11-Jul-2017 11:38 IST
जालना - येथील एका कंपनीत झालेल्या कॉपर वायरच्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासात छडा लावून आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक लाख ६२ हजार ६०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
Published 07-Jul-2017 14:41 IST
जालना - नागपुर-मुंबई समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातूनही जात आहे. या मार्गासाठी शेतकर्‍यांच्या संपादीत केलेल्या जमीनीबाबत असलेल्या आक्षेपाबाबत संघर्ष समिती व शेतकर्‍यांनी नोंदविलेल्या सुचनावर विचारविमर्श करण्यासाठी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले.
Published 06-Jul-2017 19:11 IST
जालना - हमालीचे दर वाढून मिळावेत यासाठी शहरातील बाजार समितीमध्ये हमालांनी कडकडीत बंद पुकारला आहे. यामुळे बाजारपेठेत होणारे लाखोंचे व्यवहार खोळंबले आहेत. या बंदचा मोठा फटका बाजार समितीत विक्रीसाठी माल घेवून आलेल्या शेतकर्‍यांना बसला आहे.
Published 03-Jul-2017 14:46 IST
जालना - राज्यातील शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करण्यासाठी शिवसेनेचा लढा यापुढेही चालूच राहील. असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
Published 30-Jun-2017 18:06 IST | Updated 18:18 IST
जालना - राज्य शासनाने केलेल्या कर्जमाफी प्रकरणी परतूर शहरात अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा सत्कार करण्यात आला.
Published 30-Jun-2017 17:11 IST
जालना - जिल्हा गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शहरात चारचाकी, दुचाकी वाहन चोरणार्‍या टोळीतील मोरक्यास २० लाखांच्या ८ वाहनांसह जेरबंद केले. या वाहनचोर टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Published 27-Jun-2017 22:42 IST
जालना - ईद उल फितरनिमित्त सर्वच मुस्लीम बांधवांनी आज एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने जालना शहरातील सदर बाजार ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
Published 26-Jun-2017 21:28 IST

video playशहरातील संभाजीनगरात घरफोडी; एक लाखाची चोरी
शहरातील संभाजीनगरात घरफोडी; एक लाखाची चोरी

सनी लिओनी